शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: ...म्हणून आता नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी; चीनच्या माघारनंतर काँग्रेसने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:11 IST

चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे.

नवी दिल्ली: पूर्व लडाखच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.  मात्र भारताकडून जशास तसं उत्तर मिळाल्यानं चीनच्या सैन्यानं आज माघार घेतली आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात रक्तरंजित झटापट झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. मात्र याच भागातून आता चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे. चिनी सैन्यनं माघार घेतल्यानंतर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी एक गंभीर वक्तव्य केलं. 'भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. अतिक्रमण झालेलं नाही. आमची एकही चौकी दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही', असं वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला होता. त्यातच चिनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर पुन्हा काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खेरा म्हणाले,"आमच्या शूर लष्करानं चिनी सैन्याला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला लष्कराचा अभिमान आहे. आपल्या सैन्याच्या क्षमतेबद्दल कधीही शंका नव्हती. यापूर्वी सैन्यानं हे काम केलं होतं, मग तो पाकिस्तान असो की चीन. आपल्या सैन्याला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशं पवन खेरा यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींनी भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही हे विधान अत्यंत दुर्दैवी असल्याचं पवन खेरा यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी यांनी भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही, हे विधान केल्यानंतर दोन तासाच्या आत चीननं ते विधान भारताच्या पंतप्रधानांनी क्लिन चीट दिली म्हणून चालवण्यात आलं होतं. मात्र त्याचवेळी चीननं केलेल्या निवेदनात गलवान व्हॅलीवर ताबा सांगितला होता. त्यामुळे पंतप्रधानांसारखी व्यक्ती अशा शब्दांचा उल्लेख करते, ज्याचा चीनने क्लिन चीट म्हणून वापर केला. हे संपूर्ण जग पाहत होतं. यामुळे नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातील जनतेची माफी मागायला हवी. हो मी चुकलो. मी तुमची दिशाभूल केली. किंवा मला वेगळे शब्द वापरायचे होते, पण मी चुकीचे बोललो, असं म्हणत नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी पवन खेरा यांनी केली आहे.

दरम्यान, ३० जूनला दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची बैठक झाली. त्यानंतर चिनी सैन्य मागे हटलं की नाही, याची पडताळणी करण्यासाठी रविवारी एक सर्वेक्षण करण्यात आलं. 'गलवान खोऱ्यातील झटापट झालेल्या भागापासून चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. या भागात उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामं हटवण्याचं काम दोन्ही देशांच्या सैनिकांकडून सुरू आहे,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवान