India-China Faceoff : गलवाननंतर आता 'या' महत्वाच्या भागातून चिनी सैन्य मागे; मात्र, रिज लाइनवर हालचाल सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:48 PM2020-07-08T16:48:54+5:302020-07-08T17:07:18+5:30

यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

India china faceoff chinese troops exit from hot springs sector completely | India-China Faceoff : गलवाननंतर आता 'या' महत्वाच्या भागातून चिनी सैन्य मागे; मात्र, रिज लाइनवर हालचाल सुरूच

India-China Faceoff : गलवाननंतर आता 'या' महत्वाच्या भागातून चिनी सैन्य मागे; मात्र, रिज लाइनवर हालचाल सुरूच

Next
ठळक मुद्देलडाखच्या हॉट स्प्रिंग येथील पेट्रोल पॉइंट 15वरू भारत आणि चीनी सैन्य 2 किलो मीटर मागे हटले आहे. गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून जवानांना गुरुवारी अथवा शुक्रवार दोन किलोमीटर मागे घेतले जाईल.पूर्वी फिंगर 4च्याही पूढील भागापर्यंत भारतीय जवान गस्त घातल होते.

नवी दिल्ली - पूर्वी लडाखमधीलभारत-चीन वाद आता निवळताना दिसत आहे. हा वाद जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. आता चीननेलडाखमधील आणखी एका वादग्रस्त ठिकाणावरून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या हॉट स्प्रिंग येथील पेट्रोल पॉइंट 15वरू भारत आणि चीनी सैन्य 2 किलो मीटर मागे हटले आहे. तसेच सूत्रांनी सांगितले, की गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून जवानांना गुरुवारी अथवा शुक्रवार दोन किलोमीटर मागे घेतले जाईल.

अशी आहे सद्य स्थिती -
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पेगाँग सरोवराजवळ फिंगर 4 भागात चीनी सैन्याची हालचाल दिसत आहे. या भागातून चीनी सैन्याने आपल्या गाड्या आणि टँक मागे घेतले आहेत. मात्र, रिज लाइनवर अद्यापही हालचाली सुरूच आहेत. पूर्वी फिंगर 4च्याही पूढील भागापर्यंत भारतीय जवान गस्त घातल होते. मात्र, फिंगर 4 वर चिनी सैन्याने कब्जा केल्यानंतर या भागात गस्त घालण्यात अडथळा निर्माण झाला.

यापूर्वी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची माघार - 
यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताने चीनी सैन्य हटल्याचे फिजिकल व्हेरिफिकेशनही केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जूनलाच कोर कमांडर स्तरावरील बैठकीत यावर सहमती झाली होती. यानंतर 30 जूनला कोर कमांडरच्या तिसऱ्या स्तरावरील बैठकीत  डिसएंगेजमेन्टच्या पुष्टीसाठी 72 तासांचा वॉच पिरियडदेखील निश्चित करण्यात आला होता. यानंतर आता दोन्हीकडूनही सैन्य मागे घेतले गेल्याचे वृत्त आहे. 

15 जूनला झाली होती हिंसक झटापट -
भारत आणि चिनी सैन्यांत गेल्या गलवान खोऱ्यात गेल्या 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर चीनचे जवळपास 35 जवान मारले गेल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थेने म्हटले होते. यासंदर्भात चीने अद्यापही अधिकृत आकडा घोषित केलेला नाही. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव अधिकच वाढत चालला होता. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

Web Title: India china faceoff chinese troops exit from hot springs sector completely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.