शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भारत इसिसच्या धोक्याबाबत सतर्क

By admin | Updated: November 18, 2015 03:34 IST

फ्रान्सच्या पॅरिसवरील हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेकडून असलेल्या धोक्याबद्दल भारत सतर्क असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली : फ्रान्सच्या पॅरिसवरील हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेकडून असलेल्या धोक्याबद्दल भारत सतर्क असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली आणि मुंबईसह देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नवी दिल्लीतील परदेशी दूतावास व वकिलातींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इसिसचा धोका कोणत्याही एका ठराविक देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. भारतावरही हल्ला होऊ शकतो. पण त्याबाबतीत सरकार पूर्णपणे सतर्क आहे. येथील सर्व दूतावास, उच्चायोग आणि देशाच्या विविध शहरांमधील वाणिज्य दूतावासांबाहेर सतर्कता वाढविण्यासोबतच अतिरिक्त पोलीस तैनात करण्यास सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने ब्रिटन, जर्मनी, रशिया, आॅस्ट्रेलिया, तुर्कस्तान व इस्रायलच्या दूतावासांना खास सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे.देशातील सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार, जवळपास २० भारतीय इराक आणि सिरियात इसिसच्या बाजूने हिंसाचारात सामील झाले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या कल्याणमधील दोन आणि तेलंगणाचा एक युवक, आॅस्ट्रेलियातील एक काश्मिरी, कर्नाटकातील एक व्यक्ती तसेच ओमान व सिंगापूर येथील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे.गेल्यावर्षी सहा महिने इसिससोबत राहिल्यावर कल्याणचा एक युवक मायदेशी परतला होता. त्याला मुंबईत अटक करण्यात आली.