शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

"कट्टरता अन् रक्तपातानं बनलाय पाक", UNHRCमध्ये भारतानं फोडला पाकिस्तानला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 9:46 AM

...यावर भारताने पाकिस्तानला पार उघडे पाडले. यावेळी पर्मनंट मिशन ऑफ इंडियाचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार म्हणाले, पाकिस्तानने एकदा स्वतःच्या हृदयात डाकावून पाहावे. नरसंहार करणाऱ्या या देशाची एवढी हिंम? की त्याने दुसऱ्यावर आरोप करावेत. 

ठळक मुद्देभारत म्हणाला, आपल्याकडे सुरू असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडे लक्ष द्या.आर्टिकल 370 हटवल्याचे कुठलेही बाह्य परिणाम नाही - भारतकुठे गेले बलूच पश्तून लोक? भारताचा पाकिस्तानला सवाल.

जेनेवा/नवी दिल्ली :भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा  पाकिस्तानचा डाव उधळून लावला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाच तोंडावर पडण्याची वेळ आली. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताने पाकिस्तानला पार उघडे पाडले. यावेळी पर्मनंट मिशन ऑफ इंडियाचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार म्हणाले, पाकिस्तानने एकदा स्वतःच्या हृदयात डाकावून पाहावे. नरसंहार करणाऱ्या या देशाची एवढी हिंम? की त्याने दुसऱ्यावर आरोप करावेत. 

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

आपल्याकडे सुरू असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडे लक्ष द्या -जेनेव्हामध्ये मानवाधिकार परिषदेच्या 43व्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमार म्हणाले. “पाकिस्तानकडून मानवाधिकार परिषदेचा आणि त्यांच्या प्रक्रियेचा दुरूपयोग केला जात आहे. पाकिस्तान दक्षिण आशियाई क्षेत्रातील, असा एकमेव देश आहे, की ज्या देशाचे सरकार नरसंहार करते आणि दुसऱ्यांवर आरोप करण्याची हिंमत करते. दुसऱ्यांना सल्ला देण्यापूर्वी पाकिस्तानने आपल्या देशात मानवाधिकाराबाबत काय सुरू आहे, हे पाहावे.”

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

आर्टिकल 370 हटवल्याचे कुठलेही बाह्य परिणाम नाही -गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आर्टिकल 370 हटवण्यावरही कुमार यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधून आर्टिकल 370 हटवण्याचे कोणतेही बाह्य परिणाम उमटलेले नाहीत. भारताविरोधातील अजेंडा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तान आता मानवाधिकार परिषद आणि त्यांच्या प्रक्रियेचा वापर करत आहे. हे घातक आहे,” असेही कुमार यावेळी म्हणाले.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

कट्टरता आणि रक्तपाताने बनलाय पाकिस्तान -“ज्या देशाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तो देश आज मानवाधिकार आणि सेल्फ डिटर्मिनेशनसंदर्भात प्रश्नच कसा उपस्थित करू शकतो. हा देश धार्मिक कट्टरता आणि नरसंहाराने तयार झाला आहे. हत्या आणि सत्तापालट, अशा अनेक घटनांसाठी त्यांचा इतिहासच साक्षी आहे.” असेही कुमार म्हणाले.

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

अल्पसंख्यांकांविरोधत ईश-निंदा कायद्याचा गैरवापर -“पाकिस्तानात अल्पसंख्यंकांच्या मानवाधिकाराचे उल्लंगण केले जात आहे. तेथे त्यांना घाबरवण्यासाठी ईश-निंदेसारख्या कायद्याचा गैरवापर केला जात आहे. नुकतेच सिंधमध्ये दोन हिंदू मुली, लाहोरमध्ये एक ख्रिस्ती धर्मिय मुलगी, चलेकीमध्ये अहमदी महिला आणि खैरपूरमध्ये दोन प्राध्यापकांबाबत जे घडलं, ते ईश-निंदा कायद्यांतर्गत अल्पसंख्यकांना कशा प्रकारे निशाणा बनवले जात आहे, याचेच उदारहरण आहे. 2015पासून आतापर्यंत पाकिस्तानात 56 तृतीयपंथींची हत्या करण्यात आली. या घटनाच पाकिस्ताचा खरा चेहरा समोर आणतात.” असा निशाणाही कुमार यांनी पाकिस्तानवर साधल. 

CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश

कुठे गेले बलूच पश्तून लोक?यावेळी कुमार यांनी पाकिस्तानवर आणखी एक गंभीर आरोप लावला, खैबर पख्तूनख्वामध्ये 2 हजार 500 लोक राजकीय, धार्मिक भावना आणि मानवाधिकारांचे संरक्षण करताना अचानक गायब झाले. लोकांना गायब करणे, सरकारकडून होणारा हिंसाचार आणि मोठ्या संख्येने लोकांना जबरदस्तीने विस्थापित करणे, अत्याचार करणे, न्यायबाह्य हत्या, सैन्य कारवाया, शोषण, हत्याकरून टाकून देणे, बलुचिस्तानमध्ये सैन्य शिबिरे हे कायमचेच आहे, असे कुमार म्हणाले. 

चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा

पाकिस्तानात 47 हजार बलूच आणि 35हजार पश्तून कुठे गेले याची कोणालाही माहिती नाही. सांप्रदायिक हिंसाचाराने बलूचिस्तानमध्ये 500 हजारांचा जीव घेतला आहे. तर एक लाखहून अधिक हजारा पाकिस्तान सोडून विस्तापित झाले आहे, असेही कुमार म्हणाले. 

 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान