शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची मागणी पालकमंत्र्यांनी फेटाळली स्वतंत्र डीपीसी: अधिक निधी देण्याचे आश्वासन

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

नागपूर: जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)कडून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराला कमी निधी मिळत असल्याने शहरासाठी स्वतंत्र डीपीसी तयार करावी, अशी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी केलेली मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावली. शहरासाठी अधिकचा निधी देऊन शहर आणि ग्रामीण असा भेद दूर करू व त्यामुळे वेगळ्या डीपीसीची मागणीच करावी लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर: जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)कडून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराला कमी निधी मिळत असल्याने शहरासाठी स्वतंत्र डीपीसी तयार करावी, अशी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनी केलेली मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावली. शहरासाठी अधिकचा निधी देऊन शहर आणि ग्रामीण असा भेद दूर करू व त्यामुळे वेगळ्या डीपीसीची मागणीच करावी लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गत वर्षात राज्यात काँग्रेसची सत्ता असताना नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांनी नागपूरसाठी वेगळ्या डीपीसीची मागणी केली होती. हा धोरणात्मक निर्णय असून त्यासाठी राज्य मंत्रिमंडळात चर्चा करावी लागेल, असे उत्तर मोघे यांनी दिले होते. आता राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिलीच डीपीसीची बैठक झाली. अपेक्षेप्रमाणे स्वतंत्र डीपीसीचा मुद्दा भाजपकडून महापौर प्रवीण दटके यांनी उपस्थित केला. ग्रामीणच्या तुलनेत शहराची लोकसंख्या अधिक असतानाही डीपीसीचा निधी शहराला कमी मिळतो. मग आम्ही सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित राहायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या मागणीला आमदार विकास कुंभारे यांच्यासह इतर काही आमदारांनीही पाठिंबा दिला. बैठकीत उपस्थित काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांनी त्याला विरोध केला. मुळात डीपीसी ही जिल्ह्यासाठीच असते आणि तरीही या निधीतून मेयो, मेडिकल आणि इतर कामासाठी निधी दिला जातो, त्यामुळे शहर आणि ग्रामीण असा भेद करणे अयोग्य आहे, असे केदार म्हणाले. स्वतंत्र डीपीसी करायची असेल तर नागपूर शहराला जिल्हा म्हणून घोषित करावा लागेल तरच हे शक्य आहे, याकडे मुळक यांनी लक्ष वेधले. यानंतर बावनकुळे यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत शहरासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आशवासन देऊन स्वतंत्र डीपीसीची मागणी फेटाळून लावली. (प्रतिनिधी)