धक्कादायक! अवघ्या 1 फूट जमिनीसाठी लहान भावाची केली हत्या, आरोपीला घातल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:22 IST2022-12-09T13:22:24+5:302022-12-09T13:22:59+5:30

Gorakhpur Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

In Uttar Pradesh's Gorakhpur, elder brother killed younger brother for 1 feet of land  | धक्कादायक! अवघ्या 1 फूट जमिनीसाठी लहान भावाची केली हत्या, आरोपीला घातल्या बेड्या

धक्कादायक! अवघ्या 1 फूट जमिनीसाठी लहान भावाची केली हत्या, आरोपीला घातल्या बेड्या

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला गोरखपूर पोलिसांनीअटक केली. हत्या करण्यात वापरलेली काठीही मारेकऱ्याच्या भावाकडून जप्त करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे केवळ एक फूट जमिनीसाठी मोठ्या भावाने लहान भावाला काठीने बेदम मारहाण केली होती. घटनेनंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, शहापूर पोलिसांनी मारेकरी भावाला अटक केली आहे.

दरम्यान, हे प्रकरण शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवटहिया टोला येथील आहे. स्थानिक एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई यांनी पत्रकार परिषदेतून घटनेची माहिती दिली. एसपी सिटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवटहिया टोला येथील मुरली निषाद यांना पन्नेलाल, धर्मेंद्र, जितेंद्र, राजन, गोकुळ अशी 5 मुले आहेत. पाच भावांच्या वाट्याला प्रत्येकी 12-12 फूट जमीन मिळाली होती, मात्र आरोपीने एक फूट अधिक जमीन घेतल्याने वाद झाला. यावरून सख्ख्या भावांमध्ये सतत वाद व्हायचे.

भावानेच घेतला भावाचा जीव 
एसपी सिटी यांच्या माहितीनुसार, मृत जितेंद्रची पत्नी आणि आरोपी धर्मेंद्रची पत्नी यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान, दोन्ही भाऊ काम करून घरी पोहोचले. पत्नींमधील वाद पाहून दोन्ही भाऊ एकमेकांना भिडले. अशातच मोठा भाऊ धर्मेंद्र याने लहान भाऊ जितेंद्रवर काठीने हल्ला केला. लोकांना काही समजण्यापूर्वीच धर्मेंद्रने जितेंद्रला काठीने बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे एसीपी सिटी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: In Uttar Pradesh's Gorakhpur, elder brother killed younger brother for 1 feet of land