दरोडेखोराने भरदिवसा बंदुकीच्या धाकावर महिलेला लुटले; कॉलनीत दहशत, Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 18:40 IST2022-12-12T18:38:48+5:302022-12-12T18:40:06+5:30
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरोडेखोराने भरदिवसा बंदुकीच्या धाकावर महिलेला लुटले; कॉलनीत दहशत, Video Viral
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोणी कोतवाली परिसरातील गोकुळ धाम सोसायटीत दोन दुचाकीस्वारांनी बंदुकीच्या धाकाने घराबाहेर बसलेल्या महिलेकडून सोन्याची साखळी हिसकावून नेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार देऊन या नराधमावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, चोरटे भरदिवसा बंदुकीच्या धाकावर कशी दहशत पसरवत आहेत हे व्हायरल होत असेलल्या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या घटनेवरून स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली जात आहे.
घराबाहेर बसली होती पीडिता
खरं तर ही पीडित महिला गोकुळधाम कॉलनीत तिच्या कुटुंबासोबत राहते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ती घराबाहेर बसली होती. एवढ्यात दुचाकीवरून दोन चोरटे तेथे पोहोचले. एक बदमाश दुचाकीवरून उतरला आणि बंदुकीचा धाक दाखवून बदमाशाने महिलेला घाबरवले. त्याने महिलेच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी देण्यास सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली.
यूपी का 'जिला गाजियाबाद' | लाइव लूट pic.twitter.com/oNDX0ZdUbw
— Ranvijay Singh (@ranvijaylive) December 12, 2022
सीसीटीव्हीत घटना कैद
जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर भीतीपोटी महिलेने सोन्याची साखळी चोरट्यांच्या स्वाधीन केली. साखळी चोरल्यानंतर चोरट्यांनी तिथून पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरटे पळून गेल्यानंतर पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"