भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 01:33 PM2024-03-01T13:33:20+5:302024-03-01T13:37:38+5:30

लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपावर बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे.

In the Lok Sabha elections, the BJP became the formula for allocating seats to its allies in the NDA | भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा

भाजपाचा मित्रपक्षांसाठी ६-१-३ फॉर्म्युला, महाराष्ट्रात कोणाला किती सुटतील जागा

लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. एनडीए या निवडणुकीत ४०० च्या पुढे जागा जिंकणार असा दावा केला आहे. दरम्यान, काल उमेदवारांबाबत दिल्लीत भाजपच्या हायकमांडची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. बहुतांश राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाममध्ये भाजपच्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाचा निर्णय झाला आहे. भाजप हरियाणातील सर्व दहा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे, तर महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत अजुन कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

उत्तर प्रदेशमध्ये भाजप एनडीएमधील मित्र पक्षांसाठी ६ जागा सोडणार आहे. अपना दल आणि आरएलडीला प्रत्येकी २ जागा आणि निषाद पक्ष आणि ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आसाममध्ये भाजप आपल्या मित्रपक्षांना तीन जागा देणार आहे, २ जागा एजीपीसाठी आणि एक जागा यूपीपीएलसाठी सोडली जाईल.

विधिमंडळात राडा, शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले; मंत्र्यांची धक्काबुक्की?

बिहारमध्ये जेडीयू, चिराग पासवान यांची एलजेपी, पशुपती पारस यांची एलजेपी, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांच्याशी जागावाटपावर अंतिम बोलणी होणे बाकी आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाची अंतिम चर्चा सुरू आहे. बिहार आणि महाराष्ट्रातील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० जागा आणि भाजपला ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे. त्यासाठी भाजपची तयारीही जोरदार सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जागावाटपावर एकमत झाले आहे, अजूनही अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांमध्येही जागावाटपावर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे.

भाजपाची पहिली यादी फायनल!

भाजपानेलोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीसाठी गुरुवारी रात्री मुख्यालयामध्ये मॅरेथॉन बैठक घेतली होती. या बैठकीला त्या त्या राज्यांचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय स्तरावरील नेते पहाटे साडे तीनपर्यंत उपस्थित होते. या बैठकीत भाजपाने १०० उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली आहे. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक-दोन दिवसांत येऊ शकते. या यादीत अनेक शॉकिंग बदल केले जाण्याची शक्यता आहे. 

या यादीमध्ये पीएम मोदी (वाराणसी), गृहमंत्री अमित शहा (गांधीनगर), राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्यासह बड्या नेत्यांची नावे असणार आहेत. तसेच 2019 मध्ये भाजपने कमी फरकाने गमावलेल्या किंवा जिंकलेल्या 'कमकुवत' जागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

Web Title: In the Lok Sabha elections, the BJP became the formula for allocating seats to its allies in the NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.