विधिमंडळात राडा, शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले; मंत्र्यांची धक्काबुक्की?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:51 PM2024-03-01T12:51:45+5:302024-03-01T12:58:18+5:30

महाराष्ट्रात भाजपानं जे राजकारण उभं केले, त्यात सभागृहालाच आखाडा केलेला दिसतो असा टोला नाना पटोलेंनी म्हटलं.

An argument broke out between Minister Dada Bhuse and MLA Mahendra Thorve in the Vidhan Bhavan | विधिमंडळात राडा, शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले; मंत्र्यांची धक्काबुक्की?

विधिमंडळात राडा, शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले; मंत्र्यांची धक्काबुक्की?

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यात विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचं बोलले जाते.

मात्र या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  पोलिसांनी विधानभवनात येऊ नये अशी प्रथा आहे. सत्ताधारी मंत्री आमदारांमध्ये हमरीतुमरी होणे धक्कादायक आहे. वरिष्ठांनी लहानांना कसं वागवायचे हे योग्य नाही. संस्कृती धुळीस मिळवली आहे. महेंद्र थोरवे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. विधानसभेत असं होऊ नये असं प्रामाणिक मत आहे.  विधानसभेचे नावलौकीक कायम राहू द्या असं राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

तर महाराष्ट्रात भाजपानं जे राजकारण उभं केले, त्यात सभागृहालाच आखाडा केलेला दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांवर लॉबीत भिडले गेलेत. हे खोक्याचे प्रकरण आहे. हा प्रकार लाजिरवाणा आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. 

दरम्यान, दादा भुसे यांच्याशी बोललो, समज गैरसमज असतात. मतदारसंघातील काम विचारायला गेले तेव्हा चर्चा होत असते. दादा भुसे हे मंत्री आहेत. ते दिघेंपासून एकनिष्ठ आहेत. आमदार ही व्यक्तीच असते. सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनांशी गोळीबाराशी तुलना करणे योग्य नाही. धक्काबुक्की झाली नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करून द्या यासाठी आमदार आग्रही होते. ज्यावेळी असे प्रकार घडले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. 

Web Title: An argument broke out between Minister Dada Bhuse and MLA Mahendra Thorve in the Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.