धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:32 IST2023-01-06T17:31:48+5:302023-01-06T17:32:42+5:30
उत्तर प्रदेशातील संभल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे भावाने आपल्याच बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. इथे राहणाऱ्या तरुणीचे बुलंदशहरमधील राजकुमार नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध सुरू होते.
दरम्यान, गुरूवारी रात्री मृत तरूणीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता असे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी मुलीचा भाऊ नितीन काही आवाजामुळे जागा झाला. त्यानंतर तो बहिणीच्या खोलीत गेला. तिथे भावाने बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. हे पाहताच भावाचा राग अनावर झाला. यादरम्यान प्रियकराने तिथून पळ काढला यानंतर संतापलेल्या भावाने बहिणीचा गळा दाबून तिची हत्या केली. पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांना आरोपीच्या वडिलांनी दिली माहिती
याप्रकरणी संभलचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी म्हटले, "येथील स्थानिक व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्याच्या मुलाने आपल्याच बहिणीची हत्या केली. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच या तरुणाने आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत तरूणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"