शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सरकारी नोकरीच्या लालसेपोटी पती बनला राक्षस; 5 महिन्यांच्या निष्पापाचा घेतला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:35 IST

राजस्थानच्या बिकानेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिकानेर : राजस्थानच्या बिकानेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे सरकारमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या 5 महिन्यांच्या मुलीला कालव्यात फेकून दिले. कायमस्वरूपी नोकरी मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कंत्राटी कामगाराने आपल्या मुलीला इंदिरा गांधी कालव्यात फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात पत्नीनेही पतीला साथ दिली असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दोघांनाही केलं अटक ही घटना बिकानेर जिल्ह्यातील छतरगढ पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रविवारी सायंकाळी आरोपी जोडप्याने चिमुकलीला कालव्यात फेकले होते. स्थानिक एसपी योगेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी जोडप्याला अटक करण्यात आली आहे. करारावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या व्यक्तीने पत्नीसोबत हे पाऊल उचलले होते. 

नोकरीच्या लालसेपोटी केलं धक्कादायक कृत्यपोलिसांनी सांगितले की, 36 वर्षीय झवरलाल मेघवाल हा सध्या कंत्राटी कर्मचारी असून त्याला कायमस्वरूपी सेवा मिळण्याची आशा होती. या जोडप्याला आधीच दोन मुले होती. राज्य सरकारच्या दोन अपत्य धोरणामुळे तिसर्‍या मुलाच्या जन्मानंतर त्या व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची भीती होती. यामुळे त्याने पत्नीसह हे पाऊल उचलून आपल्या बाळाला कालव्यात फेकून दिले. 

बिकानेरचे पोलीस अधीक्षक योगेश यादव यांनी सांगितले की, सोमवारी या दाम्पत्याला त्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. झवरलाल मेघवाल आणि त्यांची पत्नी गीता देवी यांच्याविरुद्ध छतरगड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसjobनोकरी