नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:48 IST2025-11-14T16:43:55+5:302025-11-14T16:48:35+5:30
बिहार विधासभा निवडणुकीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रभाव महिलांवर स्पष्टपणे दिसून येत होता. महत्वाचे म्हणजे, त्या स्पष्टपणे बोलत होत्या, “ज्याचे खातो, त्यालाच देणार.” काही महिलांमध्ये राज्य सरकारकडून मिळालेल्या 10 हजार रुपयांचीही चर्चा सुरू होती. परिणामी महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि त्याचा थेट फायदा एनडीएला झाला.

नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. महिलांनी (M) केलेले अभूतपूर्व मतदान निर्णायक ठरल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत एनडीए सरकारने नीतीश कुमारांच्या नेतृत्वात महिलांच्या सबलीकरणावर विशेष भर दिला. जीविका दीदी असो अथवा महिला रोजगार योजना, यांचा थेट फायदा एनडीएला होताना दिसत आहे. याशिवाय, निवडणूक प्रतारादरम्यान युवकांमध्ये (Y) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
बिहार विधासभा निवडणुकीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रभाव महिलांवर स्पष्टपणे दिसून येत होता. महत्वाचे म्हणजे, त्या स्पष्टपणे बोलत होत्या, “ज्याचे खातो, त्यालाच देणार.” काही महिलांमध्ये राज्य सरकारकडून मिळालेल्या 10 हजार रुपयांचीही चर्चा सुरू होती. परिणामी महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि त्याचा थेट फायदा एनडीएला झाला.
याशिवाय, युवकांमध्ये (Y) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. रोजगार, विकास आणि ‘डबल इंजिन’ सरकारच्या संदेशाने तरुण मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रचारसभांमधील मोदींच्या उपस्थितीने या वर्गाचे मतदान एनडीएकडे वळले.
दुसरीकडे आरजेडीला आपल्या परंपरागत मुस्लीम (M) आणि यादव (Y) मतदानावर प्रचंड विश्वास होता. मात्र, या निवडणुकीत त्यांचे हे समिकरण काहीसे फेल गेले. टुडे चाणक्यच्या अंदाजानुसार यादवांपैकी तब्बल 23 टक्के मतदारांनी एनडीएला पसंती दिली. काही मुस्लीम मतदारांनीही भाजप तथा एनडीएतील इतर घटक पक्षांना, तसेच एआयएमआयएम किंवा प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला मतदान केले. अर्थात त्यांच्या मतांची विभागणी झाली. सर्वात मोठा परिणाम मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवल्याने झाला. यामुळे मुस्लीम मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि आरजेडीची मत फुटली.