पटना - नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये नवीन सरकार येणार आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्री बनण्यासाठी आमदारांनी तंत्र मंत्राचा आधार घेतला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्पर्धेत सहभागी २७ आमदार तांत्रिकाच्या संपर्कात आहेत. कुणी घरातील ग्रह दोष दूर करण्यासाठी पूजा केली तर काहींनी तांत्रिकाकडून नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे म्हणून पूजा केली आहे. त्यात सध्याच्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी निभावणाऱ्या नेत्यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यापासून १२ हून अधिक मंत्र्यांच्या घरी नवरात्रीत ९ दिवसापर्यंत तंत्र साधना करण्यात आली.
बिहारच्या राजकारणात तंत्र मंत्राचं मोठं कनेक्शन आहे. बिहारच्या तंत्र साधक आणि ज्योतिषांचे दिल्लीतील नेत्यांशीही कनेक्शन आहेत. बिहारमधील बहुतांश नेत्यांसाठी उपासना, विधी आणि धार्मिक श्रद्धा हे त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनाचा एक भाग आहेत. बिहारमधील प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. श्रीपती त्रिपाठी यांचे अनेक राजकीय शिष्य आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपासून ते बिहारमधील प्रत्येक प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यापर्यंत पंडित श्रीपती त्रिपाठी त्यांच्या संपर्कात आहेत.
त्या म्हणाल्या की, बिहारमध्ये नवीन सरकारबाबत पुन्हा एकदा समीकरणे जुळत असल्याने अनेक शिष्य माझ्याकडे आले आहेत. ते नवीन सरकारमध्ये चांगल्या पदांसाठी उपाय शोधत आहेत. मी त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला आहे आणि ग्रहस्थिती अनुकूल करण्यासाठी उपाययोजना विकसित केल्या आहेत, जेणेकरून ते सरकारमध्ये मोठी जबाबदारी स्वीकारू शकतील. त्यांना राजकारणात अधिक यश आणि स्थान मिळावे यासाठी काही पूजा विधी देखील केले जातात. नवरात्रीदरम्यान मातृदेवीला प्रसन्न करण्यासाठी दृढनिश्चयाने पूजाही केली जाते असं त्यांनी सांगितले. दैनिक भास्करने केलेल्या स्टिंगमध्ये हा खुलासा समोर आला.
नेपाळ सीमेवरील रक्सौल येथील काली न्यास मंदिरात १६ हून अधिक राजकारण्यांच्या पूजाविधींविषयी माहिती मिळाली आहे. येथील तांत्रिक साधक जगद्गुरू वामाचार्य सेवक संजय नाथ आहेत, जे त्यांच्या तंत्र साधनेसाठी भारत आणि परदेशातही प्रसिद्ध आहेत. ते नेपाळी राजकारणातील अनेक प्रभावशाली नेत्यांसाठी पूजाविधीही करतात. ते काली मंदिर न्यास आणि दहा महाविद्यांच्या साधनेसाठी प्रसिद्ध आहेत. संजय नाथ यांनीही बिहारच्या राजकारणात सत्तेतील आणि विरोधकही छोट्या मोठ्या कामासाठी माझ्याशी संपर्क साधतात असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, तंत्र मंत्राच्या माध्यमातून काही आमदार, नेत्यांना कोलकाता येथेही पूजा केल्या आहेत. एका रिपोर्टरने आमदाराचा माणूस म्हणून जेव्हा पंडित विजय महाराज यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा बिहार, झारखंडच्या राजकारणातील अनेक नेते माझे शिष्य असल्याचे त्यांनी सांगितले. संमोहनाच्या तांत्रिक प्रक्रियेद्वारे तो कोणालाही नियंत्रित करू शकतो आणि त्यांच्याकडून महान कार्ये करून घेऊ शकतो असं या तांत्रिकाचा दावा आहे. काही आमदारांनी कामाख्या देवीची साधना केली असल्याचे समोर आले आहे.
Web Summary : Bihar MLAs reportedly used tantric rituals seeking ministerial positions amid government formation. Politicians consulted astrologers for favorable outcomes and performed special prayers, including at Kali temples, aiming for success in the new government.
Web Summary : बिहार में सरकार गठन के बीच मंत्री पद पाने के लिए विधायकों ने तांत्रिक अनुष्ठान किए। नेताओं ने अनुकूल परिणाम के लिए ज्योतिषियों से सलाह ली और काली मंदिरों में विशेष प्रार्थनाएँ कीं, ताकि नई सरकार में सफलता मिले।