सुधारित बातमी--- वाहतूक पोलिसाला थप्पड मारणार्‍या तृणमूल खासदारावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:44+5:302015-01-15T22:32:44+5:30

कोलकाता : शहरातील लेक टाऊन भागात एका मार्गावर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोलिसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Improved news --- The crime branch filed a complaint against Trinamool MP for slapping the traffic police | सुधारित बातमी--- वाहतूक पोलिसाला थप्पड मारणार्‍या तृणमूल खासदारावर गुन्हा दाखल

सुधारित बातमी--- वाहतूक पोलिसाला थप्पड मारणार्‍या तृणमूल खासदारावर गुन्हा दाखल

लकाता : शहरातील लेक टाऊन भागात एका मार्गावर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोलिसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेक टाऊन पोलीस चौकीतील अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ड्यूटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाला थप्पड मारल्याबद्दल मुखर्जी यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या वाहतूक पोलिसाचे बयाण नोंदविले असून पुढील तपास सुरू आहे.
भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार व हावडातील तृणमूलचे खासदार असलेल्या बॅनर्जी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. आपण अशा कुठल्याच कामात सामील नव्हतो व तसे कधी करणार नाही, असे ते पुढे म्हणाले आहेत. मी त्याला फक्त मला जाऊ दे कारण मला एका महत्त्वाच्या बैठकीत भाग घ्यायचा आहे असे सांगितले. मात्र, त्याने मला जाऊ दिले नाही व तो ओरडू लागला. तसेच दुसर्‍या एका वाहतूक पोलिसाने, हा वाहतूक पोलीस मानसिक रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशीही माहिती दिल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले.
दुसरीकडे या वाहतूक पोलिसाने, बॅनर्जी यांच्या गाडीचा नंबर टिपून घेत होतो तेव्हा त्यांनी आपल्याला थप्पड मारल्याचे सांगितले आहे.

Web Title: Improved news --- The crime branch filed a complaint against Trinamool MP for slapping the traffic police