शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित-आयएएस अधिकारी मृत्यूप्रकरण

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

आयएएस रवी मृत्यूप्रकरण

आयएएस रवी मृत्यूप्रकरण
मृत्यूपूर्वी बॅचमेट महिलेला केले होते ४४ फोन
आत्महत्येची दिली होती धमकी
बेंगळुरु : कर्नाटकातील आयएएस अधिकार डी.के. रवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या तुकडीतील सहकारी महिलेला एका तासात ४४ वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असतानाच सदर महिलेनेही रवी आपल्याशी लग्न करू इच्छित होते आणि लग्न न केल्यास जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्यांनी दिली होती, असा खुलासा केल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन त्यांच्या ताज्या घडामोडींची माहिती दिली. रवी हे एक अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या रहस्यमय मृत्यूने राज्यभरात जनआक्रोष पसरला होता. लोकसभेतही त्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटले होते.
रवी यांनी ज्या महिलेला मृत्यूपूर्वी एका तासात ४४ फोन केले होते तिलाच काही एसएमएसही पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आयएएस अधिकारी असलेली ही महिलाही विवाहित असून तिला एक अपत्य आहे. तिचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. २००९ साली एकाच तुकडीतील असल्याने रवी आणि सदर महिलेची लग्नापूर्वी मैत्री होती.
रवी यांची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी सोमवारी अनेकदा मला फोन केले. मी लग्नास तयार झाली नाहीतर जीवाचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकीही त्यांनी दिली होती. परंतु मी त्यांचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता, असा दावा या महिला अधिकाऱ्याने केला असल्याचे समजते.
मंड्या जिल्हा पंचायतीच्या सीईओ असलेल्या या महिलेने राज्याचे मुख्य सचिव कौशिक मुखर्जी यांना रवीचे सर्व एसएमएस, कॉल्स आणि ई-मेलबाबत माहिती दिली आहे. आपण कुठल्याही चौकशीस तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या सुपूर्द करण्यात आली असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. सरकारच्या भूमिकेत बदल झाला नसल्याचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते. दुसरीकडे संयुक्त जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारवर रवी यांच्या खासगी जीवनातील मुद्दा उपस्थित करून एका महिला आयएएस अधिकाऱ्यास यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. सत्य दडवून ठेवण्यासाठी असे केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वर्गमित्रांची निष्पक्ष चौकशीची मागणी
दरम्यान डी.के. रवी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आयएएस अधिकाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी केली. यासंदर्भात रवी यांच्या वर्गमित्रांकडून आम्हाला एक निवेदन मिळाले असल्याचे सेंट्रल आयएएस असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय आर. भुसरेड्डी यांनी नवी दिल्लीत सांगितले. (वृत्तसंस्था)