शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम, दाट धुक्याचे १२ बळी

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

जनजीवन विस्कळीत, अमृतसर ३.२ अंश सेल्सियस

जनजीवन विस्कळीत, अमृतसर ३.२ अंश सेल्सियस
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे. उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे घडलेल्या रस्ता अपघातात सातजण मृत्युमुखी पडले. तर पंजाबात तिघांचा मृत्यू झाला. राज्यात गुरुवारी दाट धुक्यामुळे रेल्वे आणि सडक वाहतूक विस्कळीत झाली. उत्तर भारतात गुरुवारी कमी दृश्यतेमुळे जवळपास १०० रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. धुक्यामुळे विमान वाहतूकही प्रभावित झाली आहे.
उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर येथे सर्वांत कमी २.५ अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. मैनपुरी येथे दोन आणि बदायूँ व बाराबंकी येथे प्रत्येकी एक जण रस्ता अपघातात ठार झाला. धुक्यामुळे दृश्यता कमी असल्याने हे अपघात घडले. तर बाराबंकी येथे दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाला.
पंजाबात तिघांचा मृत्यू
पंजाबात थंडीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये थंडीची लाट कायम असून पारा घसरला आहे. अमृतसर येथे गुरुवारी ३.२ अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडी आणि धुक्यामुळे वाहतूकही ठप्प पडली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी दाट धुक्यामुळे जीप आणि ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात तीन जण ठार झाले.
काश्मिरात तापमान शून्याखाली
काश्मीर खोऱ्यातील तापमान शून्याखाली गेले आहे. राजधानी श्रीनगर येथे गुरुवारी तापमान उणे ३.९ अंश सेल्शियस होते. तर लडाख येथे सलग सातव्या दिवशी तापमान उणे १० अंश सेल्शियस नोंदविण्यात आले. तापमान शून्याखाली गेल्याने प्रसिद्ध डल सरोवर गोठण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त आहे. गुरुवारी कारगीलमध्ये उणे १२.६ अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)