शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे : राष्ट्रीय

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

बुधवारी काँग्रेस सदस्यत्व मोहिमेची बैठक

बुधवारी काँग्रेस सदस्यत्व मोहिमेची बैठक
जयपूर : राजस्थान काँग्रेस कमिटीच्या सदस्यत्व मोहिमेच्या प्रदेश आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक येत्या ११ फेब्रुवारीला जयपूर येथे बोलावण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना शर्मा यांनी ही माहिती दिली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील आणि मोहिमेला गती देण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतील.
गॅस टँकरला आग, तीन गंभीर जखमी
कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील पनकी पडाव येथे रविवारी रात्री एका गॅस टँकरला आग लागल्याने चालकासह तीन जण भाजल्याचे वृत्त आहे. या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. इंडेन गॅस कंपनीचा हा टँकर घेऊन जाणारा चालक रघुराज सिंग हा रात्री चहा पिण्यासाठी एका ढाब्यावर थांबला होता. ढाब्यावर असलेल्या भट्टीतून निघालेली आगीची ठिणगी टँकरवर पडली आणि टँकरला आग लागली, असे पोलिसांनी सांगितले.
पंजाब, हरियाणात थंडी ओसरली
चंदीगड : पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी थंडीचा जोर ओसरल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दोन्ही राज्यांतील तापमान सामान्यापेक्षा जास्तच असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. चंदीगडमध्ये किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. तर हरियाणाच्या हिसार येथे ८.६ व अंबाला येथे ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
७४ बांगला देशी नागरिकांना परत पाठविले
धौलपूर : राजस्थानमध्ये गेल्या २५ डिसेंबर २०१४ रोजी अटक करण्यात आलेल्या ७४ बांगला देशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सोमवारी अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसने सियालदाह येथे नेण्यात आले. सियालदहा येथून त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाईल आणि हे अधिकारी त्यांना बांगला देशात पाठवतील.
महिला कैद्याचा मृत्यू
फिरोजाबाद : जिल्हा कारागृहात हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका महिला कैद्याचा सोमवारी मृत्यू झाला. ही महिला आजारी होती. सायरा बानो (४०) असे तिचे नाव आहे. मैनपुरीची राहणारी सायरा ही क्षयरोगाने पीडित होती. रविवारी रात्री तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी तिचा मृत्यू झाला.
एलएलबीच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन
मेरठ : एका गेस्ट हाऊसच्या मालकासह त्याच्या चार कर्मचाऱ्यांना एलएलबीच्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिला जबर मारहाण केल्याच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे. ३ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. ही विद्यार्थिनी याच गेस्ट हाऊसमध्ये नोकरी करीत होती. गेस्ट हाऊसचा मालक सुभाष भारती याने तिच्याशी आधी लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञानाने पुत्र प्राप्तीसाठी दबाव टाकला. विद्यार्थिनीने त्यास नकार दिल्यावर त्याने तिला जबर मारहाण केली.
विदेशी पर्यटकाच्या पासपोर्टची चोरी
फरिदाबाद : सुरजकुंड मेळ्यादरम्यान एका विदेशी महिलेचा पासपोर्ट आणि अन्य एका भारतीय पर्यटकाचा मोबाईल चोरी झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. लेबनान येथून आलेली फातिमा खातुनी हिचा पासपोर्ट व आयफोन चोरांनी पळविला. तर दिल्लीचे दीपक यांचा मोबाईल चोरण्यात आला.