शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उसाचा पालापाचोळा ऊस उत्पादनावर परिणाम : उद्योगावर मंदीचे सावट

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्‍या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े

शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्‍या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े
अक्कलकोट तालुक्यात दहिटणे येथे स्वामी सर्मथ सहकारी साखर कारखाना आणि रुद्देवाडी येथील मातोर्शी लक्ष्मीबाई शुगर हे दोन कारखाने आहेत़ शिवाय शेजारील तालुक्यात नव्याने उभारण्यात येणार्‍या कारखान्यांची भिस्त कुरनूर धरणाजवळील ऊस क्षेत्रावर अवलंबून आह़े ऊस उत्पादनासाठी तालुक्यात कुरनूर धरणाशेजारील कुरनूर, बावकरवाडी, चपळगाव, सिंदखेड, मोट्याळ, बर्‍हाणपूर, दहिटणे या गावात बहुतांश शेतकरी ऊस उत्पादनावर भर देत आले आहेत, परंतु धरणच कोरडे पडल्याने उसाची उभी पिके जळताना दिसत आहेत़ ऊस लागवड आणि तो सांभाळण्यासाठी केलेला खर्चही निघेल की नाही याची शंका आह़े त्यामुळे शेतकरी कर्जाबाजारात बुडत आह़े शिवाय मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नांसह अन्य समारंभ करणे मुश्कील झाल्याचे शेतकरी शिवानंद दुलंगे यांनी सांगितल़े

इन्फो बॉक्स
यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर
कुरनूर धरणातील पाणीसाठा संपल्याने ऊस उत्पादनावर साहजिकच त्याचा यंदा फार मोठा परिणाम होत आह़े सर्वत्र पाण्याअभावी बागायतीचे क्षेत्र घटले आह़े त्यामुळे उसाचे क्षेत्रदेखील कमी झाले आह़े नेमक्या याच कारणामुळे यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर असेल़ त्यातच काही पशुपालकांनी जनावरांसाठी चारा म्हणून उसाला प्राधान्य दिले आह़े धरण क्षेत्रातील मातोर्शी, कंचेश्वर, लोकमंगल, सिद्धेश्वर कारखान्याच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत, पण दरवर्षीप्रमाणे तोडण्यायोग्य ऊस नसल्याने कामगारही नाराज आहेत़ ऊस उत्पादन कमी झाल्याने गाळप हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता असल्याचे लोकमंगलचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील यांनी सांगितल़े

कोट
पावसाअभावी खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आह़े त्यांचा आर्थिक भार कशाने भागवावा याची चिंता आह़े त्यामुळेच सोमवारचा आठवडा बाजार सुनासुना होत चालला आह़े शेतकर्‍यांचा खिसा रिकामा असल्याने तो बाजारपेठेत जाण्याचे धाडस करीत नाही, परिणामी व्यापार्‍यांवरही संक्रांत ओढवली आह़े
- अभिजित पाटील,
व्यापारी, अक्कलकोट

फोटो आह़े