शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

निर्भयाच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या; राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 05:52 IST

निभर्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आप खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत केली.

नवी दिल्ली : निभर्याच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आप खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत केली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींची फाशी प्रलंबित आहे. आता राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करावा, असे संजय सिंह म्हणाले.

सभापती व्यंकय्या नायडू यांनीदेखील या संवेदनशील मुद्यावर न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हायला हवी, असे म्हटले.चारही आरोपींना शिक्षा झाली आहे. अद्याप फाशी मात्र झालेली नाही. अनेक जण या मुद्यावर राजकारण करीत असल्याची टीकाही संजय सिंह यांनी केली. निर्भया प्रकरणानंतर २०१२ साली संपूर्ण देश रस्त्यावर आला. अद्यापही मृत निर्भया व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळला नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फाशीच्या अंमलबजावणीत राज्य सरकार आडकाठी करीत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सभागृहात उपस्थित आपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.

संरक्षण विभागामुळे विकास रखडला

संरक्षण विभागाच्या जागेवर बांधकामासाठी मुबंई उच्च न्यायालयाने गेल्या दोन वर्षांपासून सूचना दिल्यानंतरही नियमावली तयार नसल्याची तक्रार खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. संरक्षण मंत्रालयाने नियम करणे गरजेचे होते. ते न झाल्याने देशात अनेक ठिकाणी बांधकाम ठप्प झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र, त्यामुळे सरकारी अधिकारी विकासकामांना रोखू शकत नाही, असेही शेवाळे म्हणाले.

बेरोजगारीचे आव्हान

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची चर्चा सुरू असताना अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून किती जण भारतात आले, याची संख्या एकदाही सरकारने सांगितली नाही. सीएए, एनआरसी नव्हे तर बेरोजगारीच भारतासमोरची सर्वात मोठी समस्या आहे, असे शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी सरकारला सुनावले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राऊत यांनी सरकारला घेरले.

हिंगणघाटमधील घटनेचे लोकसभेत पडसाद

वर्धा जिल्ह्यातील युवतीस जिवंत जाळण्याच्या अमानवीय घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले. खासदार नवनीत राणा यांनी सभागृहाचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्या म्हणाल्या, हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात युवतीवर पेट्रोल टाकून तिला पेटवण्यात आले. मध्यमवर्गीय कुटुंबातील ती युवती मृत्यूशी झुंज देत आहे. आम्ही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ म्हणतो; पण बाहेर मुली सुरक्षित नाहीत. अशा घटना रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षित वाटेल, असा कठोर कायदा करावा.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्लीPoliceपोलिसGovernmentसरकारIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र