शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:49 IST

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशमधील पांवटा साहिब येथील सूरजपूर येथे प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीच्या जमिनीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी सुरजपूर येथील काही महिला द ग्रेट खलीसोबत नाहन येथे पोहोचल्या आणि त्यांनी उपायुक्त प्रियंका वर्मा यांची भेट घेऊन तक्रार मांडली.  

हिमाचल प्रदेशमधील पांवटा साहिब येथील सूरजपूर येथे प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीच्या जमिनीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी सुरजपूर येथील काही महिला द ग्रेट खलीसोबत नाहन येथे पोहोचल्या आणि त्यांनी उपायुक्त प्रियंका वर्मा यांची भेट घेऊन तक्रार मांडली. त्यांनी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप करत आपली संपूर्ण तक्रार उपायुक्तांसमोर मांडली. यावेळी खली आमि महिलांनी उपायुक्तांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तसेच निष्पक्षपणे कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने योग्य ती चौकशी करावी आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबीयांसोबत न्याय करावा.  

तक्रारकर्त्यांनी सांगितले की, ते २८-०८ बीघा जमिनीचे सहहिस्सेदार आहेत. गेल्या पाच दशकांपासून आम्ही येथे राहत आहोत. मात्र आता कुटुंबीयांवर अचानक दबाव आणला जात आहे. तसेच आमची जमिन हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना खली याने सांगितले की, २० मे रोजी २०२५ रोजी पहिल्यांदा काही जणांनी जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ, महिला आणि तक्कारदारांनी घटनास्थळी पोहोचून हे प्रयत्न हाणून पाडले.  ही संपूर्ण कारवाई महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीमधून करण्यात आला. तर दुसरी घटना ही १८ जुलै २०२५ रोजी घडली. तसेच काही लोकांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला.

संबंधित तहसीलदार ऐणि काही महसूल अधिकारी आपल्याकडील अधिकारांचा चुकीचा वापर करत आहेत, असा आरोपही तक्रारीमधून करण्यात आला आहे. हे अधिकारी खाजगी व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. आमच्याकडे जमिनीशी संबंधित सर्व  कागदपत्रे उपलब्ध आहेत, आवश्यकता भासल्यावर ती सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, द ग्रेट खली आणि इतर महिलांनी पप्रसारमाध्यमांसमोर येऊन केलेल्या आरोपांनंतर पांवटा साहीबचे तहसीलदार ऋषभ शर्मा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. तसेच त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Great Khali alleges land grab, accuses Tehsildar of manipulation.

Web Summary : The Great Khali alleges illegal land grab in Himachal Pradesh. He and local women accuse officials of helping private parties seize their ancestral land, ignoring ownership documents. Khali demands a fair investigation, while the Tehsildar denies all allegations.
टॅग्स :The Great Khaliद ग्रेट खलीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश