"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 14:37 IST2025-10-12T14:36:01+5:302025-10-12T14:37:27+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी दक्षिण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत भाजपाने काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले आहेत.

"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २६ सप्टेंबर पासून दक्षिण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या दौऱ्याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये मालवीय म्हणाले, "आता १५ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे आणि त्यांच्या भेटीच्या खऱ्या उद्देशापासून लक्ष विचलित करण्यासाठी बनवलेल्या काही व्हिडिओंव्यतिरिक्त, संपूर्ण शांतता आहे." मालवीय यांनी त्यांच्या इतर कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले, "राहुल गांधी कुठे आहेत आणि ते दक्षिण अमेरिकेत काय करत आहेत? इतकी गुप्तता का आहे, असा सवाल त्यांनी केला.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
'निवडणुका आल्या आहेत, म्हणून आता तरी परत या'
मालवीय यांनी शनिवारी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले की, "जर राहुल गांधी कॉफी बनवायला शिकले असतील आणि कोलंबियामध्ये सुट्टी घालवत असतील, तर त्यांनी भारतात परतावे. बिहार निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि एका महिन्यापेक्षा कमी वेळात मतदान सुरू होईल. महाआघाडी पुन्हा हरेल. आणि नेहमीप्रमाणे, काँग्रेस त्यांच्या हरवलेल्या नेत्याशिवाय सर्वांना दोष देईल", असा टोलाही लगावला आहे.
निशिकांत दुबेंनी चौकशी करण्याची केली मागणी
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या गेल्या दहा वर्षांतील परदेश दौऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. ७ ऑक्टोबर रोजी, दुबेंनी सांगितले की, राहुल गांधींसह कोणत्याही खासदाराला अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी सरकारी परवानगीची आवश्यकता नाही.
राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात, दोन केंद्रीय मंत्री - ग्रामीण विकास राज्यमंत्री चंदुलाल चंद्रकर, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री के.पी. सिंह देव आणि राज्य इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्ष एम.एस. संजीव राव - यांना हेरगिरी प्रकरणात नाव आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला, असंही ते म्हणाले.