शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 08:34 IST

काँग्रेसने विचारला प्रश्न; १८ ते २४ दरम्यान होणार दौरा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये जर सगळे काही ‘सामान्य’ आहे, तर मग ३६ केंद्रीय मंत्र्यांना तिकडे पाठवायचे कारण काय, असा प्रश्न काँग्रेसने गुरुवारी सरकारला विचारला. ‘प्रचार करणारे’ पाठवण्याची गरज का निर्माण झाली, असे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी टिष्ट्वटरवर विचारले.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेला घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत आणि राज्यात विकासाच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट या महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्याचे अंतिम स्वरूप शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरणार आहे.

‘अमित शहा म्हणाले की, काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य आहे. जर तसे आहे, तर ३६ प्रचार करणाऱ्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याची गरज का? तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रचार न करणाºयांना का जाऊ दिले जात नाही’, असे कपिल सिबल यांनी विचारले. १८ ते २४ जानेवारीदरम्यान केंद्रशासित प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरा करतील व गृहमंत्रालय त्यांच्या भेटीचे समन्वयन करील.स्थिती सामान्य नव्हे, तर घबराटीची‘३६ मंत्री जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा दिवस फिरतील, हे परिस्थिती सामान्य नव्हे, तर घबराट असल्याचे चिन्ह आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे ही घोडचूक असून, या अशा तात्पुरत्या उपायांनी काही साध्य होणार नाही, असे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरचा दौरा करण्याची ही दुसरी वेळ आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपा