जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:35 PM2023-04-15T12:35:59+5:302023-04-15T13:14:15+5:30

सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे, असा आरोप आपने केला आहे.

If Sisodia broke 14 smartphones, how about 5 with ED, CBI? Arvind Kejariwal asked questions before CBI enquiry | जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य

जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य

googlenewsNext

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या चार्जशीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआयने दारु घोटाळ्यात केजरीवालांना नोटीस पाठविल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. ईडी सिसोदियांनी १४ फोन तोडून टाकल्याचे जे दावे करत आहे, त्यापैकी ४ फोन स्वत: ईडीकडे आहेत. तर एक सीबीआयकडे, हे कसे काय, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. 

दारु घोटाळा तर झालेलाच नाहीय. यामुळे या तपास यंत्रणांकडे काहीही नाहीय. चंदन रेड्डी नावाच्या व्यक्तीला मारहाण झाल्याचा उल्लेख ईडीने चार्जशीटमध्ये केला आहे, असेही केजरीवाल म्हणाले. सीबीआयने अबकारी निती घोटाळ्याविरोधाच केजरीवाल यांची रविवारी चौकशी करणार आहे. 

उद्या त्यांनी (सीबीआय) मला बोलावले आहे आणि मी नक्की जाईन. जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही... भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर सीबीआय त्यांच्या सूचनांचे पालन करेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे. यामुळे आप झुकणार नाही, व केजरीवाल देखील झुकणार नाहीत. केजरीवालांनीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला आहे. यामुळेच त्यांना गप्प करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे होऊ देणार नाही, असे आपच्या नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. 

सीबीआयला घाबरणारा नाही 
सीबीआय व ईडीच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. मी वेगळ्या मातीचा आहे. या सर्वांचा मी सामना करण्यास तयार आहे. माझे शब्द कदाचित चुकीचे असतील परंतु तुमचे कर्म हे फुटके आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सत्य समोर येईल : भाजप
सीबीआयच्या चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या सर्व घोटाळयामागे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हात असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात होता. सीबीआयने दिलेल्यासमन्सने हा दावा योग्य होता, हे स्पष्ट झाल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे. 

सिसोदियांनाही रविवारचे समन्स 
सीबीआय रविवारीच नेत्यांना समन्स बजावित असल्याचे पुन्हा दिसून आले. मनीष सिसोदिया यांनाही सीबीआयने चौकशीसाठी २६ फेब्रुवारी (रविवार) राेजी बोलाविले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही रविवारीच (१६ एप्रिल) चौकशीसाठी पाचारण केले आहे.
 

Web Title: If Sisodia broke 14 smartphones, how about 5 with ED, CBI? Arvind Kejariwal asked questions before CBI enquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.