शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुखर्जी पंतप्रधान असते तर सत्ता गेलीच नसती

By admin | Updated: December 16, 2015 03:58 IST

सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते.

नवी दिल्ली : सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते. प्रणव मुखर्जी पंतप्रधान असते तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे राहिले असते,असे आजही अनेकांचे मत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘दी अदर साइड आॅफ दी माऊंटेन’ या आपल्या नव्या पुस्तकात हे विचार मांडले आहेत.जून १९९१ ते १९९६ या काळात नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलली होती. संपूर्ण राष्ट्राने यासाठी त्यांची प्रशंसा केली होती. मात्र १९९९ मध्ये मनमोहनसिंग देशातील काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या गेलेल्या दक्षिण दिल्लीतून निवडणुकीच्या आखड्यात उतरले आणि अनेकांना कदाचित स्मरणातही नसेल अशा एका उमेदवाराने त्यांचा पराभव केला. मनमोहनसिंग यांचा पराभव करणारे हे उमेदवार होते भाजपाचे विजय कुमार मल्होत्रा. सुरुवातीचा सौम्य विरोध सोडला तर संपुआ-१ चे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांची निवड केली तेव्हा या निर्णयाचे मोठे स्वागत झाले. केवळ स्वागतच नाही तर पाच वर्षांनंतर जनतेने पुन्हा एकदा संपुआला कौल देऊन हा निर्णय योग्य ठरवला, असे खुर्शीद यांनी लिहिले आहे. माझे पुस्तक कुण्या एका व्यक्तीचे नाही तर संपुआचा भाग असलेल्या अनेकांचे संक्षिप्त चरित्र आहे,असेही खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात आवर्जून नमुद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘पक्षात नैराश्य पसरले होते’२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतरच्या घडामोडींचा उल्लेखही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. १६ मे रोजी लोकसभेचा निकाल आला. आम्ही (संपुआचे मंत्री) विविध मतदारसंघातून नवी दिल्लीला परतलो. पराभव झाला होता पण पराभव मान्य न करणाऱ्या योद्ध्यांसारखी आमची स्थिती होती. आता आम्ही भूतकाळ होतो. काँग्रेसमध्ये नैराश्य पसरले होते, असे त्यांनी लिहिले आहे. हाच धागा पकडून काँग्रेसचे अस्तित्व संकटात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही लोकप्रिय नेते आहेत आणि लोकांमधून निवडून आलेले नेते आहे. मात्र पर्यायी नेतृत्वाचा विचार केल्यास दूरदूरपर्यंत काँग्रेसमध्ये कुणीच दिसत नाही, असेही त्यांनी लिहिले आहे.