शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:29 IST

दहावीची ५ मे, तर बारावीची परीक्षा ८ एप्रिलपासून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डानेही (आयसीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा ५ मे ते ७ जूनपर्यंत, तर बारावीची परीक्षा ८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत होणार आहे. 

आयसीएसई मंडळाने साेमवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक केले आहे. एखादा विद्यार्थी दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने पोहोचल्यास त्याला उशिरा पोहोचण्याचे योग्य कारण न देता आल्यास परीक्षेसाठी प्रवेश देता येणार नाही. .विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचता यावी यासाठी परीक्षेच्या १५ मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. मात्र परीक्षेला सुरुवात दिलेल्या वेळेतच होईल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क बंधनकारक असून, दोन विद्यार्थ्यांमधील अंतर सहा फुटांपेक्षा जास्त ठेवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :examपरीक्षा