राजकीय जीवन समाप्त झाले तरीही मी खोटे बोलणार नाही - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:54 AM2020-07-28T04:54:27+5:302020-07-28T04:55:00+5:30

चीनच्या मुद्यावर पुन्हा सरकारवर हल्लाबोल

I will not lie even if my political life ends - Rahul Gandhi | राजकीय जीवन समाप्त झाले तरीही मी खोटे बोलणार नाही - राहुल गांधी

राजकीय जीवन समाप्त झाले तरीही मी खोटे बोलणार नाही - राहुल गांधी

Next

नवी दिल्ली : माझे राजकीय जीवन समाप्त झाले तरीही चालेल; पण चीनच्या मुद्यावर मी खोटे बोलणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मी खरेच बोलणार आणि चीनबाबतची वस्तुस्थिती देशासमोर मांडत राहणार. त्याचे काय परिणाम होतील, याची मला चिंता नाही, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, चिनी सैनिक आमच्या भागात घुसले आहेत हे वास्तव आहे. ही बाब मला अस्वस्थ करते. मी जेव्हा याबाबत बोलतो तेव्हा माझ्यावर हल्ला केला जातो. देशाला कमजोर करत असल्याचा आरोप केला जातो आणि मी गप्प बसावे अशी अपेक्षा केली जाते. मी असे सांगावे की, चिनी सैन्य देशाच्या सीमेत घुसलेच नाही. म्हणजे, सरकारची अशी इच्छा आहे की, मीसुद्धा देशातील लोकांना खोटे बोलू; पण मी असे कधीही करणार नाही.

‘ते’ सातत्याने खोटे बोलत आहेत
राहुल गांधी यांनी मोदी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. ते म्हणाले की, चीनचे सैन्य भारतीय हद्दीत घुसले आहे आणि ते सातत्याने खोटे बोलत आहेत. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की, मी सैन्य अधिकारी, सॅटेलाईट छायाचित्रे आणि तमाम अधिकाऱ्यांशी बोलून याची माहिती घेतली की, खरोखरच चिनी सैन्य भारतीय सीमेच्या आत घुसले आहे काय, जेव्हा याची खात्री पटली तेव्हाच मी या माहितीच्या आधारे सवाल उपस्थित केले.
च्खोटे बोलून लोक भलेही राष्ट्रवादी असल्याचा प्रचार करत असतील; पण खोटे बोलणारे राष्ट्रवादी असू शकत नाहीत ना देशभक्त.

Web Title: I will not lie even if my political life ends - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.