i will chop your neck says haryana cm manohar lal khattar threatens to his leader | VIDEO: तुझी मान कापून टाकेन; हाती कुऱ्हाड घेत मुख्यमंत्र्यांची भाजपा नेत्याला धमकी
VIDEO: तुझी मान कापून टाकेन; हाती कुऱ्हाड घेत मुख्यमंत्र्यांची भाजपा नेत्याला धमकी

चंदिगढ: जनआशीर्वाद यात्रेदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादात सापडले आहेत. खट्टर यांचा स्पक्षीय नेत्याला धमकी देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हातात कुऱ्हाड घेतलेले खट्टर स्वपक्षीय नेत्याला धमकी देताना दिसत आहेत. यामुळे खट्टर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खट्टर यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील आहे. यात खट्टर एका वाहनावर उभे राहिलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड शत्रूचा नाश करण्यासाठी असते, असं म्हणत खट्टर उपस्थितांशी संवाद साधत आहेत. याचवेळी खट्टर यांच्या मागे असलेल्या एका भाजपा नेत्यानं खट्टर यांना पारंपारिक टोपी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र खट्टर यांना ही गोष्ट न आवडल्यानं ते संतापतात आणि स्वपक्षीय नेत्याला मान कापण्याची धमकी देतात. व्हायरल व्हिडीओत संतप्त झालेले खट्टर दिसत आहेत. भाजपा नेत्यानं टोपी घालण्याचा प्रयत्न करताच खट्टर त्यांना 'हे काय करत आहात? मान कापून टाकेन तुझी. एका बाजूला जा,' असं म्हणत धमकी देतात. यानंतर भाजपा नेता खट्टर यांची माफी मागतो.  यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राग आणि अहंकार आरोग्यासाठी हानीकारक असतो. खट्टर साहेबांना राग का येतो? कुऱ्हाड घेऊन त्यांच्याच नेत्याला म्हणतात, मान कापून टाकेन. मग जनतेसोबत काय करतील?', अशा शब्दांमध्ये सुरजेवालांनी खट्टर यांना लक्ष्य केलं.


Web Title: i will chop your neck says haryana cm manohar lal khattar threatens to his leader
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.