"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:43 IST2025-10-07T12:42:08+5:302025-10-07T12:43:06+5:30
Maithili Thakur Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली, त्याच दिवशी मैथिली ठाकूरने भाजपचे नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली.

"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
Maithili Thakur Constituency Bihar Election: गेल्या काही महिन्यांपासून राजकीय धुरळा उडत असलेल्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत आहे आणि त्यामुळेच आता कोणत्या मतदारसंघात उमेदवार कोण? या चर्चांनाही वेग आला आहे. यात गायिका मैथिली ठाकूरही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी एक पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मैथिली ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. तर मैथिली ठाकुरनेही आता निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मैथिली ठाकूरने विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. भाजपकडून मैथिली ठाकूरला विधानसभा निवडणुकीत उतरवले जाणार असल्याचे पाटणातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मैथिली ठाकूरला कोणत्या मतदारसंघातून लढण्याची इच्छा?
विधानसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागलेल्या मैथिली ठाकूरने सांगितले की, तिला मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी विधानसभा मतदारसंघातून किंवा दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे.
मैथिली ठाकूर मूळची बेनीपट्टीचीच आहे. तिचे याच मतदारसंघातील मतदार यादीत नाव आहे. तर अलीनगर विधानसभा मतदारसंघात तिच्या आजीचे घर आहे.
मैथिली ठाकूर म्हणाली, "मी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात तयार आहे. पक्ष ज्या मतदारसंघातून उमेदवारी देईल, तिथून लढेन."
विनोद तावडे आणि नित्यानंद राय यांच्यासोबत चर्चा
मैथिली ठाकूरने वडिलांसोबत भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. त्यानंतर ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. विनोद तावडे यांनीही एक पोस्ट करून याचे संकेत दिले.