मै तो मोदी से 'इश्क' करता हूँ, FIR दाखल होताच शायर मुनव्वर राणांचा यु टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:12 PM2021-08-21T17:12:33+5:302021-08-21T17:13:37+5:30

शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनेलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली होती. त्यानंतर, त्यांच्याविरोद्ध अनेकांनी रोष व्यक्त केला. राणांच्या विधानाविरोधात जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

I fall in love with Modi, munavvar rana u turn about taliban and fall love in modi | मै तो मोदी से 'इश्क' करता हूँ, FIR दाखल होताच शायर मुनव्वर राणांचा यु टर्न

मै तो मोदी से 'इश्क' करता हूँ, FIR दाखल होताच शायर मुनव्वर राणांचा यु टर्न

Next
ठळक मुद्देशायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनेलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली होती. त्यानंतर, त्यांच्याविरोद्ध अनेकांनी रोष व्यक्त केला. राणांच्या विधानाविरोधात जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण

लखनौ - प्रसिद्ध ऊर्दू शायर मुनव्वर राणा यांनी तालिबानचं समर्थन करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "तालिबाननं योग्य केलं. आपल्या जमिनीवर कशाही प्रकारे कब्जा केला जाऊ शकतो," असं विधान राणा यांनी केलं. "तालिबान दशतवादी संघटना असू शकते, परंतु जर ते आपल्या देशासाठी लढत आहेत, तर तुम्ही त्यांना दहशतवादी कसं म्हणू शकता," असंही राणा यांनी म्हटलं होतं. महर्षि वाल्मिकी यांची तुलनाही त्यांनी तालिबानशी केली होती. मात्र, आता आपल्या वक्तव्यावरुन त्यांनी यु टर्न घेतला आहे.  

शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनेलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली होती. त्यानंतर, त्यांच्याविरोद्ध अनेकांनी रोष व्यक्त केला. राणांच्या विधानाविरोधात जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच, लखनौमध्येही एफआयआर दाखल झाला आहे. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच राणा यांनी आपल्या वक्तव्यावरुन यु टर्न घेत, माझं विधान गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलही मुनव्वर राणा यांचं मत चांगलंच बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझं प्रेम आहे, असे राणा यांनी म्हटलंय. तसेच, तालिबान्यांपेक्षा जास्त हत्यारं भारतातील गुंड-माफियांकडे आहेत, या मी केलेल्या विधानाला गंभीरतेनं घेण्याच गरज नाही, असेही त्यांनी सांगितलं आहे. 

देशातील विकासात सरकारसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणा यांनी मोदींचं कौतुक केलं. मी मोदींना पसंत करतो, याशिवाय माझी कमजोरी ही आहे की, मी मोदींवर प्रेम करतो, असे राणा यांनी म्हटलं आहे. मी जेव्हा पुरस्कार वापस केला होता, तेव्हा ते माझ्यावर नाराज झाले होते. तसेच, माझ्या आईच्या निधनानंतरही त्यांनी मला सांत्वनपर पत्र पाठवले होते. मी मोदींना भेटायला गेलो होतो, तेव्हाही त्यांच्या चांगला वार्तालाप झाल्याचे राणा यांनी सांगितले. सबका साथ-सबका विकास हा नारा प्रत्यक्षपणे अंमलात आल्यास सम्राट अशोक यांच्यासारखं इतिहासाच्या पानात मी आपणास पाहू इच्छितो, असेही राणा यांनी म्हटलं. राणा यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

कोळी बांधवांनी केली होती, गुन्हा दाखल

शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर मुनव्वर राणा यांनी रामायणकार व कोळी समाजबांधवांचे दैवत महर्षी वाल्मीक यांची तुलना तालिबान्यांशी करत, त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करीत धार्मिक भावना दुखावल्याचे कैलास सोनवणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. 
 

Web Title: I fall in love with Modi, munavvar rana u turn about taliban and fall love in modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.