"केस मागे घ्यायला मी काही योगी नाही", लैंगिक शोषण प्रकरणी कोर्टाचे आदेश येताच स्वामी अविमुक्तेश्वरानंद भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 05:44 IST2026-02-22T05:42:26+5:302026-02-22T05:44:48+5:30

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

"I am not a yogi adityanath to withdraw the case", Swami Avimukteshwaranand got angry after the court order in the sexual abuse case. | "केस मागे घ्यायला मी काही योगी नाही", लैंगिक शोषण प्रकरणी कोर्टाचे आदेश येताच स्वामी अविमुक्तेश्वरानंद भडकले

"केस मागे घ्यायला मी काही योगी नाही", लैंगिक शोषण प्रकरणी कोर्टाचे आदेश येताच स्वामी अविमुक्तेश्वरानंद भडकले

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याशी संबंधित लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रयागराज एडीजे बलात्कार आणि पॉक्सो न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आणि कायदेशीर तपास करण्यास सांगितले आहे.  दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सर्व आरोप निराधार असून, वेगाने तपास करावा, अशी मागणी केली आहे. 'मी योगी आदित्यनाथ नाहीये की, जो आपल्यावर झालेले आरोप हटवेल", असा टोला स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी लगावला आहे. 

स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "माझ्याविरोधातील खटला पूर्णपणे खोटा आहे. लवकरच यातील सत्य समोर येईल. तक्रारदार स्वतःची हिस्ट्रीशीटर आहे आणि त्याचे नाव अनेक प्रकरणांमध्ये नोंदवले गेले आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने नाही, तर राम भद्राचार्यंच्या एका शिष्यानेच केले आहेत."

"विलंब लावू नका, तात्काळ कारवाई करा"

या प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी न्यायालयाला विनंती केली की, "हे प्रकरण अनावश्यकपणे विलंबित ठेवू नका. यांचा वेगाने तपास करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. मी याप्रकरणाला धैर्याने सामोरे जाईल. माझा पोलिसांवर विश्वास आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी. तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे", असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. 

लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने काय म्हटले आहे?

एडीजे पॉक्सो एक्टचे न्यायाधीश विनोद कुमार चौरसिया यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी. न्यायालयाचे आदेश मिळताच झुन्सी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू केली जाणार आहे. 

या प्रकरणात १३ फेब्रुवारी रोजी आरोप करणाऱ्या अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले गेले. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने पोलिसांच्या रिपोर्टचीही दखल घेतली आणि आदेश राखून ठेवला होता. 

Web Title : स्वामी अविमुक्तेश्वरानंद ने आरोपों से इनकार किया, कोर्ट ने यौन उत्पीड़न मामले में जांच के आदेश दिए

Web Summary : स्वामी अविमुक्तेश्वरानंद पर यौन उत्पीड़न के आरोप; कोर्ट ने जांच के आदेश दिए। उन्होंने सभी आरोपों को निराधार बताया, त्वरित जांच की मांग की और कहा कि वह सहयोग करेंगे। उन्होंने कहा कि वह योगी आदित्यनाथ नहीं हैं जो आरोप वापस लेंगे।

Web Title : Swami Avimukteshwaranand Denies Charges, Court Orders Probe in Sexual Assault Case

Web Summary : Swami Avimukteshwaranand faces sexual assault accusations; court orders investigation. He denies all charges, calling them baseless and demanding a swift, high-level inquiry, asserting his cooperation. He also made a jibe, stating he's not Yogi Adityanath to drop charges.