रोगप्रतिकारकक्षमतांच्या आजारांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गुणकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:02 AM2020-04-10T06:02:23+5:302020-04-10T06:02:47+5:30

लष्करी वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांकडून वापर : भारतात मोठ्या प्रमाणात होते औषधाची निर्मिती

Hydroxychloroquine multiplicative on immunosuppressive diseases | रोगप्रतिकारकक्षमतांच्या आजारांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गुणकारक

रोगप्रतिकारकक्षमतांच्या आजारांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गुणकारक

Next

निनाद देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरील परिणामकारक औषध कोरोना या रोगावर काही अंशी गुणकारक असल्याने जगात या रुग्णांना हे औषध दिले जात आहे. हे औषध उपचार पद्धतीमध्ये किती गुणकारी आहे, यावर शोध सुरू आहे. प्रामुख्याने हे औषध मलेरिया झालेल्या रुग्णांना दिले जाते. यासोबतच संधिवात, रोगप्रतिकारक्षमतेशी निगडित आजारांवर (आॅटो इम्यून डीसीज) हे औषध चांगले परिणामकारक आहे. यामुळे लष्करातील डॉक्टरांकडून याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, अशी माहिती लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील औषध विभागाचे डॉ. सुमन घोष तसेच बायोकेमिस्ट्री विभागाचे डॉ. विवेक आंबाडे यांनी दिली. 
‘कोव्हिड १९’ या रोगाने जगात थैमान घातले आहे. भारतातही या रोगाचे रुग्ण वाढत आहे. यावर सध्या कुठलीही लस तयार झाली नाही. मात्र, काही देशांत डॉक्टरांतर्फे या रुग्णांना मलेरियावरील प्रभावी औषध असलेले हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध दिले जात आहे. हे औषध प्रभावी असल्याचे जाणवले असून, या औषधाची मागणी वाढली आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाबाबत डॉ. सुमन घोष, डॉ. विवेक आंबाडे म्हणाले, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध केवळ मलेरियासाठीच नाही तर संधिवात आणि आॅटो इम्यून डीसीजपासून बचाव करण्यासाठी वापरले जाते. भारतीय लष्कर अनेक दुर्गम भागात, उंच पर्वतरांगा, अतिशय उष्ण तर अतिशय थंड अशा विविध वातावरणात देशाची सेवा करत असतात. या वेळी त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यातील मलेरिया आणि तत्सम आजार प्रमुख आहेत. यासोबतच अनेक रोगप्रतिकारकक्षमतेशी निगडित आजारही जवानांना होत असतात. या रोगांपासून वाचण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध डॉक्टर प्रामुख्याने देतात. या औषधामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकक्षमता वाढते यामुळे ते रोगांपासून दूर राहतात.
कोव्हिड १९ आजाराच्या काही रूग्णांना हे औषध दिले जात आहे. हे औषध विषाणूची वाढ काही अंशी रोखत असल्याचे जगात या आजारावर हे औषध वापरायचा सल्ला दिला जात आहे. मात्र, अद्यापही यावर औषध किंंवा लस तयार झाली नसल्याने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे १०० टक्के कोरोनावर प्रभावी आहे, असे म्हणता येणार नाही. काही नागरिक थेट मेडिकलमधून हे औषध घेत आहेत. हे चुकीचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतील. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच कोरोनापासून वाचायचे असल्यास घरीच राहावे, हा सध्या तरी प्रवाभी उपाय या आजारावर आहे.

भारतात मलेरियाचे रूग्ण जास्त असल्याने या औषधाचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात केले जाते. निर्यांतबंदी उठवली तरी या औषधाच्या मोठ्या प्रमाणात निर्मितीची क्षमता भारताकडे आहे. अमेरिकेत या औषधाचे उत्पादन होत नाही. यामुळे त्यांनी भारताकडे या औषधाची मागणी केली. अमेरिकेबरोबर ब्राझील आणि काही आफ्रिकन देशांनी या औषधाची मागणी केली आहे. निर्यात करूनही आपल्या रूग्णांना या औषधाचा पुरवठा कमी पडणार नाही याची केंद्र सरकारने नक्कीच तरतूद केली असेल. -डॉ. विवेक अंबाडे,
लष्करी वैद्यकीय महाविद्यालय

हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध कोरोना आजार बरा होण्यासाठी त्याला प्रतिबंध घालण्यासाठी या औषधाचा उपयोग होऊ शकतो. हे औषध कोरोनाबाधित रुग्णांसाठी नसून त्यांच्या संपर्कात आलेले संशयित रूग्ण, क्वारंटाईन केलेले नागरिक आणि कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर यांच्यासाठी आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही, असा आयसीएमआरचा नियम आहे. -डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष,
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

काय आहे आॅटो इम्यून डीसीज
आॅटो इम्यून डीसीज हे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेशी निगडीत आहेत. या आजारांत आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पेशींना आपले शरीर शत्रू समजून त्या नष्ट करायला लागतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही कमी होते. यामुळे विविध आजार होतात. यात ३१ प्रकारचे आजार आहेत. यातील ल्यूपस या आजाराची लागण ही सर्वाधिक झाल्याचे आढळते. त्वचारोगाशी संबंधित हा आजार आहे. यासोबतच संधिवात, अस्थमा, स्जोग्रेन सिंड्रोम हे आजार आॅटो इम्यून डीसीजमध्ये येतात. स्जोग्रेन सिंड्रोममध्ये डोळे कोरडे पडणे, खाज सुटणे, तोंड कोरडे पडणे, घामोळ्या, कोरडी खाजणारी त्वचा, तसेच स्रायू आणि सांधे दुखणे यांचा समावेश आहे.

Web Title: Hydroxychloroquine multiplicative on immunosuppressive diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.