Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:36 PM2022-06-08T12:36:01+5:302022-06-08T12:36:23+5:30

Hyderabad Gangrape Case: 28 मे रोजी एका 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता, त्याप्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

Hyderabad Gangrape Case: Hyderabad Gangrape Case; 6 accused including MIM MLA's son and nephew arrested | Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

Next

हैदराबाद: हैदराबादमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी AIMIM च्या आमदाराच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात पार्टीनंतर घरी परतणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर 28 मे रोजी सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. यामध्ये आरोपी मुलांचे राजकीय घराण्याशी संबंध असल्यामुळे हे प्रकरण हैद्राबादसह देशभरात चर्चेत आले आहे. सहा आरोपींपैकी एक प्रौढ आणि पाच अल्पवयीन आहेत.

सरकारी गाडीतून झाले अपहरण
आरोपींमध्ये आमदाराच्या मुलासह त्याचा पुतण्याही आहे. ज्या इनोव्हा कारमध्ये हा गुन्हा घडला, ती सरकारी कार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले की, ही कार एका आरोपीच्या वडिलांना देण्यात आली होती. आरोपीचे वडील मोठे नेते असून ते एका प्रमुख सरकारी संस्थेचे प्रमुखही आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून त्यापैकी पाच अल्पवयीन आहेत. 

या आरोपांखाली अटकेत
पोलिस आयुक्त आनंद यांनी सांगितले की, आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कारासाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही, तर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या कलम 354 नुसार ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित पाच आरोपींवर कलम 376 (डी) (सामूहिक बलात्कार), 354, 366 (अपहरण), पॉक्सो कायदा, आयटी कायदा (पीडितेचे व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी) आणि इतर अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुलांच्या पालकांना अटक होऊ शकते
आमदाराच्या मुलाला अटक करायला इतका वेळ का लागला? या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त आनंद म्हणाले की, पोलिसांना पीडितेच्या जबाबात सर्व पुरावे मिळून पाहायचे आहेत. याशिवाय इतरही अनेक बाबींकडे लक्ष दिल्यावरच आमदार पुत्राला ताब्यात घेता आले. पोलिस सर्व अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक करण्याचा विचार करत आहेत, मात्र आधी वस्तुस्थिती तपासली जाईल, असे आयुक्त आनंद यांनी सांगितले.

Web Title: Hyderabad Gangrape Case: Hyderabad Gangrape Case; 6 accused including MIM MLA's son and nephew arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.