जम्मू- काश्मीरमध्ये त्रिशंकू स्थिती

By Admin | Updated: December 23, 2014 14:03 IST2014-12-23T08:31:11+5:302014-12-23T14:03:11+5:30

जम्मू-काश्मीरध्ये एकाही पक्षाला बहुमत नसल्याने राज्यात त्रिशंकू अवस्था होण्याची शक्यता आहे.

Hungry condition in Jammu and Kashmir | जम्मू- काश्मीरमध्ये त्रिशंकू स्थिती

जम्मू- काश्मीरमध्ये त्रिशंकू स्थिती

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.२३ - दहशतवादामुळे धुमसत असलेल्या काश्मीर खो-यातील नागरिकांनी बुलेटने बॅलेटला उत्तर देत विक्रमी मतदान केल्यानंतर राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असून भाजपा व पीडीपी यांच्यातील लढतीमुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पीडीपी २६ तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्ष मागे फेकला गेला आहे. एनसी १७ तर काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे. सध्या कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपा पीडीपीची साथ घेईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

८७ जागांसाठी झालेल्या या विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता नागरिकांनी निर्भयपणे मतदान केले. मोदींच्या करिश्म्यामुळे भाजपाने प्रथमच या राज्यात एवढी मुसंडी मारली आहे. नॅशनल कॉन्फरन्सची घसरण कायम असून  काँग्रेस पक्ष चौथ्या स्थानावर आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांना पराभवाचा धक्का
राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला नॅशनल कॉन्फरन्स पक्ष पिछाडीवर गेलेला असतानाच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभवाचा  धक्का बसला आहे. सोनावर या मतदारसंघात अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे. 
पीडीपीच्या अशरफ मीर यांनी त्यांना सोनावरमध्ये पराभव केला आहे. दरम्यान पराभवानंतर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून मीर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. 
 

Web Title: Hungry condition in Jammu and Kashmir