शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात त्रिशंकू; झारखंडमध्ये भाजपा

By admin | Updated: December 24, 2014 03:07 IST

झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट कौल दिला. पण जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीला सर्वाधिक जागा

श्रीनगर/ रांची : झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट कौल दिला. पण जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) मिळालेल्या सर्वाधिक जागाही सत्तास्थापनेसाठी पुरेशा नसल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा काबीज केल्यानंतर झारखंडमध्येही भाजपा सत्तेच्या दारात आहे. तेथे भाजपा-अखिल झारखंड विद्यार्थी मोर्चा पक्ष (एजेएसयूपी) यांची युती सत्तेवर येईल. झारखंडमधील यशाने मोदींच्या लोकप्रियतेवर पुन्हा मोहर उमटली असली, तरी जम्मू वगळता काश्मीरच्या खोऱ्याने साथ न दिल्याने तेथे मोदींचे मिशन-४४ असफल झाले. या परिस्थितीत पीडीपी कोणाच्या साथीने सरकार बनविणार, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त २८ जागा जिंकणाऱ्या पीडीपीला बहुमतासाठी अन्य पक्षांची मदत घेणे अपरिहार्य आहे. शिवाय २५ जागा मिळालेली भाजपाही सर्व पर्यायांचा अवलंब करीत सरकार स्थापण्याचा दावा करण्याच्या मन:स्थितीत आहे. > ओमर अब्दुल्ला एका ठिकाणी पराभूत; दुसरीकडे निसटता विजयजम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सोनावर मतदारसंघात पराभवाचा झटका बसला, पण बीरवा या दुसऱ्या जागी ते केवळ एक हजार मतांच्या फरकाने विजय मिळवू शकले. काँग्रेसची चौथ्या जागेपर्यंत घसरण झाली. सज्जाद लोण यांच्या जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्सने (जेकेपीडीएफ) दोन, तर सीपीआयएमने एक जागा मिळविली.पीडीपीसमोर तीन पर्याय१ काँग्रेस आणि इतर अपक्षांची मदत घेणे२भाजपाला सत्तेत सहभाग देणे३नॅशनल कॉन्फरन्सशी हातमिळवणी करून अपक्षांची मदत घेणे