घरफोडीत हजारोंचे साहित्य लंपास

By Admin | Updated: September 18, 2016 23:51 IST2016-09-18T22:47:05+5:302016-09-18T23:51:03+5:30

नाशिक : टुर्स व ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील येवलेकर मळा परिसरात घडली आहे़

Hundreds of thousands of literature | घरफोडीत हजारोंचे साहित्य लंपास

घरफोडीत हजारोंचे साहित्य लंपास

नाशिक : टुर्स व ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील येवलेकर मळा परिसरात घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष सराफ यांचे सिमार संकुलमध्ये ग्लोबल टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे़ चोरट्यांनी या दुकानाच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला़ तसेच दुकानातील दोन ड्रील मशीन, ग्राईंडर मशीन, कटिंग ब्लेड्स, ग्राईंडर व्हिल्स, तांबेची तार, इंटरनल बुस्टर, वेल्िंडग रॉड, हॅमर, ट्युब, लेव्हलर, छन्नी, ड्रिल, मशीन बेल्ट असा ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of thousands of literature