Howdy Thailand, Mr Rahul Gandhi? BJP leader criticizes Rahul Gandhi | हाउडी थायलंड, मिस्टर राहुल गांधी? मोदींवर टीका केल्यानंतर भाजपा नेत्याने लगावला टोला
हाउडी थायलंड, मिस्टर राहुल गांधी? मोदींवर टीका केल्यानंतर भाजपा नेत्याने लगावला टोला

ठळक मुद्दे नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली होतीराहुल गांधी यांच्या त्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना  भाजपा नेते विजय चौथाईवाले यांनी 'हाउडी थाडलंड, मिस्टर राहुल गांधी? अशी विचारणा केली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील ह्युस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. आता राहुल गांधी यांच्या त्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना  भाजपा नेते विजय चौथाईवाले यांनी 'हाउडी थाडलंड, मिस्टर राहुल गांधी? अशी विचारणा केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नियोजित अमेरिका दौऱ्यामध्ये ह्युस्टन येथे 50 हजारहून अधिक भारतीयांना संबोधित करणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी ह्युस्टन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाल 'हाउडी मोदी' असे नाव दिले आहे. दरम्यान, खूप गाजावाजा होत असलेल्या या कार्यक्रमावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे मिस्टर मोदी. असं वाटतंय की अर्थव्यवस्थेची अवस्था काही बरोबर नाही, अशी टीका   राहुल गांधीं केली होती. त्याखाली 'हाउडी इकॉनॉमी हा हॅशटॅग दिला होता.''दरम्यान, आज राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या या केलेल्या टीकेला भाजपाचे परराष्ट्र विषयक प्रभारी विजय चौथाईवाले यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. 'हाऊडी थायलंड, मिस्टर राहुल गांधी?' असा टोला त्यांनी लगावला आहे. 

विजय चौथाईवाले हे भाजपाचे परराष्ट्रविषयक विभागाचे प्रभारी आहेत. अनिवासी भारतीयांना भाजपाशी जोडून घेण्याचे काम ते करतात. जगभरात जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असतो तिथे हाती महिने आधी पोहोचून प्रचार करण्याचे काम ते करतात.  

ह्युस्टन येथे होणार हाउडी मोदी कार्यक्रम 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. मात्र या संबोधनापूर्वी मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, या कार्यक्रमात मोदी  उपस्थित ५० हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत. 


Web Title: Howdy Thailand, Mr Rahul Gandhi? BJP leader criticizes Rahul Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.