भारताने किती विमाने गमावली; राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:57 IST2025-05-20T08:57:14+5:302025-05-20T08:57:38+5:30
ऑपरेशन सिंदूरची माहिती भारताने पाकिस्तानला आधीच दिली होती, या मी केलेल्या आरोपावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बाळगलेले मौन ही गंभीर बाब आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली. ते

भारताने किती विमाने गमावली; राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरची माहिती भारताने पाकिस्तानला आधीच दिली होती, या मी केलेल्या आरोपावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बाळगलेले मौन ही गंभीर बाब आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली. ते म्हणाले की, पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची माहिती दिल्यानंतर संघर्षात भारताने किती विमाने गमावली, याचा आकडाही जाहीर करा. त्यावर भाजपने म्हटले आहे की, राहुल गांधी हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. काँग्रेस पक्ष खरेच देशाच्या बाजूने आहे का, असा सवालही भाजपने केला.
राहुल गांधी म्हणाले की, मी केलेल्या विधानांबद्दल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाळलेले मौन केवळ सूचक नाही तर धोकादायकही आहे. एखाद्या कारवाईची माहिती शत्रूदेशाला देणे हा अपराध आहे. याबाबतीतील सत्य जाणून घेण्याचा देशाला हक्क आहे.