शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

VIDEO: नेतेहो, कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांना संभ्रमित करायचं कसं?; भाजप कार्यकर्त्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 9:50 AM

Farmers Protest against Farm Laws: कृषी कायद्यांसंदर्भात भाजपकडून बैठकीचं आयोजन; बैठकीतला व्हिडीओ व्हायरल

गुरुग्राम: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. तिन्ही कायदे मागे घ्या ही या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांना संभ्रमित करण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. मात्र आता एका व्हिडीओमुळे भाजप अडचणीत आला आहे."माझी वेळ संपत आलीय"; शेतकरी नेत्यानं भाषणाला पूर्णविराम दिला अन् श्वासही थांबलाहरयाणात कृषी कायद्यांबद्दल संवाद साधण्यासाठी भाजपकडून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तळागाळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. 'कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आमचं ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ दिल्या जाणाऱ्या तर्कांच्या आधारावर ते बोलत नाहीत. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल,' असं भाजपचा एक कार्यकर्ता व्यासपीठावरील नेत्यांना सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. गुरुग्राममध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भाजपचे हरयाणा युनिटचे प्रमुख ओ. पी. धनखड, क्रीडा मंत्री संदीप सिंह आणि हिसारचे खासदार बृजेंद्र सिंह उपस्थित होते. त्यांच्या समोर एका भाजप कार्यकर्त्यानं शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची गरज असल्याचं म्हटलं. हा व्हिडीओ काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केला आहे. सुरजेवाला यांनी व्हिडीओ शेअर करताना भाजपवर निशाणा साधला आहे. कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले'भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आणि मंत्र्यांना भेटत आहेत. शेतकऱ्यांना कसं मूर्ख बनवायचं याबद्दल ते विचारणा करत आहेत. भाजपकडून दिले जाणारे तर्क शेतकऱ्यांना पटत नाहीत हे यातून स्पष्ट होतं. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, जो शेतकऱ्यांना दिसत नाही,' असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीच्या वेशीवर नोव्हेंबरच्या अखेरपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघालेला नाही.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा