The villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers who had come to explain the benefits of the Farm law | कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले

कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला ग्रामस्थांनी केला तीव्र विरोधभाजपाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ खाप चौधरींची भेट घेण्यासाठी गावात आले होते. मात्र ग्रामस्थांनी वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली लावत त्यांची वाट अडवलीशिष्टमंडळामध्ये असलेले केंद्रीय मंत्री संजय बालियान यांचे समर्थक आणि स्थानिकांमध्ये झाली मोठ्या प्रमाणात वादावादी

शामली (उत्तर प्रदेश) - काही महिन्यांपूर्वी पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपाच्या (BJP) अडचणी आता वाढताना दिसत आहेत. (Farm Law) एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. (Farmer protest ) उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्याच्या (Uttar Pradesh) दौऱ्यावर गेलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हाकलून दिल्याची घटना घडली आहे. यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी भाजपा मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही केली. (villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers Sanjay Balyan who had come to explain the benefits of the Farm law)Farmer protest 

भाजपाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ खाप चौधरींची भेट घेण्यासाठी गावात आले होते. मात्र ग्रामस्थांनी वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली लावत त्यांची वाट अडवली. त्यानंतर शिष्टमंडळामध्ये असलेले केंद्रीय मंत्री संजय बालियान यांचे समर्थक आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. ही घटना शामली जिल्ह्यातील भैंसवाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री संजय बालियान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या मंत्री आणि नेत्यांचे एक शिष्टमंडळ बत्तीसा खापचे चौधरी बाबा सूरजमल यांच्यासोबत कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र येथे येत असताना त्यांना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. गावात मंत्री येत असल्याचे कळताच ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली लावून वाट अडवली. त्यानंतर मंत्री आणि शिष्टमंडळाने कसाबसा गावात प्रवेस केला. मात्र शेतकऱ्यांनी भाजपा मुर्दाबादची घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
या प्रकारानंतर मंत्री संजय बालियान यांचाही तोल सुटला. त्यांनी गाडीवर उभे राहत शेतकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अशा दहा जणांनी विरोध केल्याने मुर्दाबाद होत नाही. दरम्यान, बुढियान खापचे बाबा सचिन कालखंडे, बाबा संजय कालखंड यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला होता. त्यानंतर गठवाला खापचे बाबा हरिकिशन मलिक यांची भेट घेण्यासाठी ते भैंसवाला गावात पोहोचले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers who had come to explain the benefits of the Farm law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.