शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला हवे हॉटेल व खानावळीवर नियंत्रण

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

शासनाला प्रस्ताव पाठविणार : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णयनागपूर : अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टारेन्ट व खानावळी इत्यादीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत असल्याने यावर महापालिकेचे नियंत्रण असावे. असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठक ीत ...


शासनाला प्रस्ताव पाठविणार : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णय
नागपूर : अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टारेन्ट व खानावळी इत्यादीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत असल्याने यावर महापालिकेचे नियंत्रण असावे. असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठक ीत सभापती रमेश सिंगारे यांनी दिले.
सरकारच्या धोरणानुसार मनपा क्षेत्रात औषधी चिठ्ठी मुक्त योजना राबविण्यावर चर्चा करण्यात आली. हा विषय सभागृहात मांडण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील बाजारपेठेत रात्रीला साफसफाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांत जागृती व्हावी, यासाठी झोन स्तरावर सभा आयोजित करण्याची सूचना सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी केली.
शासनाच्या आकृतीबंधानुसार आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पदे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विभागाला आवश्यक असलेल्या पदाबाबतचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. जनजागृती करण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना तिवारी यांनी केली.
उपसभापती साधना बरडे, समती सदस्य शीला मोहोड, विद्या कान्हेरे, श्रावण खापेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. शिल्पा जिचकार, अन्न निरीक्षक सुधीर फटींग आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकट....
सणासुदीला कत्तलखाने बंद
महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन, रामनवमी, महावीर जयंती, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, साधू वासवानी जयंती आदी दिवसांना कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद असतात. या व्यतिरिक्त गोकु ळाष्टमी, आंबेडकर जयंती, बली प्रतिपदा, बौद्ध पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, गणेश स्थापना दिवस व गुढीपाडवा आदी सणासुदीच्या दिवसांना शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीनंतर सरकारकडे पाठविण्याचे निर्देश सभापतींनी दिले.