शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा, 18 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 2:52 PM

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात ही घटना घडली. 40 मजुर जेवायला गेल्याने मोठा अनर्थ टळला.

मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील हलवाड येथे एका मीठाच्या कारखान्याची भिंत कोसळल्याने 30 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यातील 12 मजुरांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. या घटनेनंतर जेसीबी मशिनच्या सहाय्याने भिंत उचलून मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हलवड जीआयडीसी येथील सागर सॉल्ट नावाच्या कारखान्याची भिंत दुपारी बाराच्या सुमारास कोसळली. यावेळी 30 मजूर कारखान्यात काम करत होते. त्यांच्यासोबत काही मजुरांची मुलेही होती, ती ढिगाऱ्याखाली आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. भिंत कोसळल्यानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर स्थानिक आमदार परशोत्तम साबरिया हेही घटनास्थळी पोहोचले. भिंत कशामुळे कोसळली हे अद्याप समजू शकलेले नाही.

40 हून अधिक कामगार जेवायला गेले होतेभिंतीजवळ बसून कामगार मीठ बांधत होते. यादरम्यान संपूर्ण भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. अपघाताच्या अर्धा तास आधी येथे 70 हून अधिक मजूर काम करत होते, मात्र यातील 40 हून अधिक मजूर जेवायला बाहेर पडले होते. अन्यथा आणखी कामगारांचा मृत्यू झाला असता. कंपनीतील काही कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले मजूर हे राधानपूर तालुक्यातील गावातील रहिवासी आहेत.

 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातDeathमृत्यू