गृहमंत्री राजनाथ सिंह होळी खेळणार नाहीत

By Admin | Updated: March 13, 2017 00:45 IST2017-03-13T00:45:46+5:302017-03-13T00:45:46+5:30

छत्तीसगढमधील सुकमा येथे शनिवारी माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे १२ जवान ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर

Home Minister Rajnath Singh will not play Holi | गृहमंत्री राजनाथ सिंह होळी खेळणार नाहीत

गृहमंत्री राजनाथ सिंह होळी खेळणार नाहीत

नवी दिल्ली : छत्तीसगढमधील सुकमा येथे शनिवारी माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे १२ जवान ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी होळी न खेळण्याचे ठरवले आहे. गृह मंत्रालयाच्या
प्रवक्त्याने ही माहिती रविवारी येथे दिली. जवानांची तुकडी गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील शस्त्रे लुटली.
सकाळी सव्वानऊ वाजता छत्तीसगढची राजधानी रायपूरपासून ४५० किलोमीटरवर भेज्जी पोलिस ठाण्यांतर्गत कोट्टाचेरू खेड्यानजीक घनदाट जंगलात हा हल्ला झाला.

Web Title: Home Minister Rajnath Singh will not play Holi