हरियाणात भीषण अपघात! उभ्या असलेल्या ट्रकवर क्रूझरची धडक, पाचजण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 09:18 IST2023-05-31T09:13:26+5:302023-05-31T09:18:41+5:30

या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

hisar tragic road accident near rampur village cruiser and bike collided with a parked truck 5 killed | हरियाणात भीषण अपघात! उभ्या असलेल्या ट्रकवर क्रूझरची धडक, पाचजण जागीच ठार

हरियाणात भीषण अपघात! उभ्या असलेल्या ट्रकवर क्रूझरची धडक, पाचजण जागीच ठार

हरियाणातून एक धक्कादायर घटाना समोर आली आहे. आज सकाळी हरियाणातील नॅशनल हायवे ९ वर ट्रक आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यात एका महिलेचा समावेश आहे. 

मिळालेली माहिती अशी, हरियाणातील राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक थांबलेला होता. या ट्रकला एका क्रुझर गाडीने पाठिमागून धडक दिली. या धडकेत क्रुझरमध्ये असलेल्या पाच जणांचा जागीच मृ्त्यू झाला, यात एका महिलेचाही समावेश आहे. 

Wrestler Protest: भाजप नेत्याचा कॉल, कुस्तीपटूंचा गंगेत पदके विसर्जित न करण्याचा निर्णय

एका कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना क्रूझरमधून घेऊन जात होते. अतिवेग आणि पावसामुळे ही वाहने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. अपघातानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि मदतकार्य सुरू केले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांचे मृतदेह हंसीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Web Title: hisar tragic road accident near rampur village cruiser and bike collided with a parked truck 5 killed