शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

हिराखंड एक्सप्रेसला अपघात की घातपात ?

By admin | Updated: January 22, 2017 10:31 IST

जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 -  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची शंका व्यक्त होत आहे. हिराखंड एक्सप्रेसला झालेल्य़ा अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र रुळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याने किंवा तोडफोड केल्याने अपघात झाल्याची शक्यता रेल्वे मंत्रालयाने नाकारलेली नाही.  
 शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात  आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातामागे घातपात असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला अपघात होण्यापूर्वी याच मार्गावरून एक मालगाडी व्यवस्थितपणे मार्गस्थ झाली होती, तसेच ट्रॅकमननेही रेल्वे रुळांची पाहणी केली होती. मात्र हा अपघात होण्यापूर्वी  एक्स्प्रेसच्या चालकाने रुळांवर फटाके फुटण्यासारखा आवाज ऐकला होता. 
दरम्यान, हिराखंड एक्स्प्रेसला जिथे अपघात झाला तो भाग नक्षलवादाने प्रभावित विभागात असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वाभूमीवर रेल्वे रुळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातामागे  घातपात असण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात कानपूरजवळ इंदुर-पटना एक्स्प्रेसला झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असल्याचे समोर आले होते.