Hindu Mahasabha: हिंदू महासभेची मोठी घोषणा! निवडणूक जिंकल्यास ‘या’ शहराचे नाव बदलणार; नथुराम गोडसे नगर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:18 PM2022-11-23T13:18:58+5:302022-11-23T13:19:56+5:30

Hindu Mahasabha: मुस्लिम मतांसाठी शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेने केला.

hindu mahasabha to contest uttar pradesh municipal elections and announced meerut renamed as nathuram godse nagar | Hindu Mahasabha: हिंदू महासभेची मोठी घोषणा! निवडणूक जिंकल्यास ‘या’ शहराचे नाव बदलणार; नथुराम गोडसे नगर करणार

Hindu Mahasabha: हिंदू महासभेची मोठी घोषणा! निवडणूक जिंकल्यास ‘या’ शहराचे नाव बदलणार; नथुराम गोडसे नगर करणार

googlenewsNext

Hindu Mahasabha: आताच्या घडीला देशभरात अनेक ठिकाणी निवडणुकांचे वातावरण आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात विधानसभा निवडणुकांसह उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच हिंदू महासभेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळाल्यास एका शहराचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. 

अखिल भारत हिंदू महासभा मेरठ महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यासोबतच एक मोठी घोषणा केली आहे. मेरठमध्ये जर हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे केले जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेने केली आहे. याशिवाय हिंदू महासभेने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेवरही हिंदू महासभेने जोरदार टीका केली. मुस्लिम मतांसाठी शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेने केला.

हिंदू महासभा नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरवणार

या वर्षाअखेर मेरठमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत हिंदू महासभा नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरवणार आहे आणि जर मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले आणि महापौरपद मिळाले तर मेरठचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर केले जाणार असल्याचा दावा हिंदू महासभेने केला. यासोबतच शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार आहेत. पूर्वी भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदू पक्ष म्हणवत असे, पण इतर समाजातील लोकांचाही वरचष्मा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: hindu mahasabha to contest uttar pradesh municipal elections and announced meerut renamed as nathuram godse nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.