हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:25 IST2026-01-09T17:24:13+5:302026-01-09T17:25:08+5:30
अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील संगडाह उपविभागातील हरिपुरधार येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक खासगी बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'जीत कोच' ही खासगी बस कुपवीहून शिमल्याच्या दिशेने जात होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास बस हरिपुरधार बाजारपेठेतून शिमल्याकडे जाण्यासाठी निघाली असताना ही मोठी दुर्घटना घडली. यावेळी बस चालकाच अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळली.
हिमाचल प्रदेश के सिरमौर में बड़ा सड़क हादसा हुआ है, जहां एक प्राइवेट बस गहरी खाई में गिर गई, जिसमें अब तक 7 लोगों की मौत हो गई है और कई लोग घायल हुए हैं। बस शिमला से कुपवी जा रही थी और हरिपुरधार में हादसे का शिकार हो गई।
— Dinesh Sharma (@sdineshaa) January 9, 2026
A private bus plunged into a deep gorge in Sirmaur,… pic.twitter.com/TaSO5uucKB
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बस हरिपुरधार बाजारपेठेतून शिमल्याच्या दिशेने निघाली, त्याच वेळी हा अपघात घडला. बाजारपेठेपासून अवघ्या १०० ते २०० मीटर पुढे जाताच चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे ३६ हून अधिक प्रवासी होते, ज्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश रोल्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. संगडाह, राजगड आणि ददाहू येथून पोलीस आणि बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक एन.एस. नेगी हे देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे.