Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:05 IST2025-08-19T12:04:42+5:302025-08-19T12:05:20+5:30
Himachal Pradesh Kullu Cloudburst Video: हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रात्री उशिरा ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले.

Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कुल्लू जिल्ह्यातील दुर्गम भागात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक घरे आणि वाहने वाहून गेली आहेत. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
VIDEO | Kullu, Himachal Pradesh: Cloudburst in Lag Valley left bridges and roads damaged, affecting connectivity in the area.
— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2025
Heavy rains continue to lash parts of the hilly state, triggering landslides at several places.
(Full video available on PTI Videos-… pic.twitter.com/UplOtBQmzz
कुल्लू-मंडी सीमेवर ढगफुटी
मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांच्या सीमेवरील भुभू जोत पर्वतावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे डोंगराच्या कुल्लू बाजूकडील लघाटी येथे तीन घरे आणि काही वाहने वाहून गेली. तसेच, मंडी जिल्ह्यातील चौहर खोऱ्यातही मोठे नुकसान झाले आहे. चौहर खोऱ्यातील सिल्हबुधानी, कुंगड आणि स्वार या गावांमध्ये एक दुकान, दोन मत्स्यपालन प्रकल्प, तीन पदपथ आणि शेकडो एकर जमीन वाहून गेली आहे. १९९३ मध्येही याच भागात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
हिमाचलमध्ये जनजीवन विस्कळीत, ४०० रस्ते बंद
राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४०० हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. सतलज नदीच्या काठावरील भूस्खलनामुळे शिमला जिल्ह्यातील सुन्नी भागात शिमला-मंडी रस्ता बंद झाला आहे. या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने तो धोकादायक बनला आहे. त्याचबरोबर थाली पुलावरून जाणारा पर्यायी मार्गही बंद झाल्याने कारसोगचा शिमलाशी संपर्क तुटला आहे.
मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासन सतर्क
सध्या स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.