शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

उत्तर भारतात उष्णतेची लाट, उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 8:39 AM

भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे.

नवी दिल्लीः भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे. वेगवेगळ्या राज्यांत उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या उष्णतेच्या झळा फक्त मैदानी राज्यांनाच नव्हे, तर पर्वतीय राज्यांनाही बसत आहेत. हिमाचलमधल्या ऊनामध्ये 42 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच पर्वतीय भागात उष्णतेचा कहर जाणवतो आहेत. आणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं आहे. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे.तर रविवारी तिथे 48.9 डिग्री सेल्सियस तापमान होतं. तसेच श्रीगंगानगर आणि बीकानेरमध्येही तापमान 48 अंशांच्या वर गेलं होतं. बाडमेर, जैसलमेर आणि कोटामध्ये तापमान 47 अंश सेल्सियसहून अधिक राहिलं. हवामान खात्यानं उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं सांगत 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमधल्या बांदामध्ये काल दुपारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दुपारनंतर कोसळलेल्या पाऊस सरींनी काहीशी विश्रांती दिली असली तरी वादळानं अंगावर झाड आणि खांबे कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये वातावरणात बदल झाला आहे. चमोली, रुद्रपयाग, पिथोरीगड आणि उत्तरकाशीशिवाय डेहराडून आणि हरिद्वारमध्ये हलक्या पावसानं गारवा निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात