शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येप्रकरणी फुटीरतावादी यासिन मलिकविरोधात होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 17:05 IST

सध्या तिहारमधील कारागृहात बंद असलेल्या यासिन मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. 

नवी दिल्ली - हवाई दलाच्या चार जवानांच्या केलेल्या हत्येप्रकरणी काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी नेते यासिन मलिक यांच्याविरोधात १ ऑक्टोबरपासून टाडा कोर्टात सुनावणीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या तिहारमधील कारागृहात बंद असलेल्या यासिन मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी २५ जानेवारी १९९० रोजी स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांची श्रीनगरच्या बाहेरील भागात हत्या करण्यात आली होती. रावलपोरा येथे झालेल्या या हत्याकांडासाठी यासिन मलिक यांच्या दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यात आले होते. हवाई दलाच्या जवानांवर घातक हल्ला करण्याचे कारस्थान रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू येथील टाडा न्यायालयाने मलिक यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून ११ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.  २५ जानेवारी १९९० रोजी झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्क्वॉड्रन लीडर खन्ना यांनी कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापासून आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्रास्रांद्वारे केलेल्या हल्ल्यात खन्ना यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या एकेरी खंडपीठाने १९९५ मध्ये श्रीनगरमध्ये टाडा न्यायालय नसल्याचा हवाला देत मलिक यांच्याविरोधात खटल्याची सुनावणी करण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर २००८ मध्ये यासिन मलिक यांनी अमरनाथ यात्रेवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जीवितास धोका असल्याचे सांगत या प्रकरणाची सुनावणी श्रीनगरमध्येच घेण्यात यावी अशी मागणी विशेष न्यायालयासमोर केली होती. अखेर यावर्षी २६ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर हायकोर्टाने एकेरी खंडपीठाने दोन खटल्यांची सुनावणी श्रीनगरला वर्ग करण्याच्या २००८ रोजी दिलेला निर्णय रद्द केला होता.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालय