शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्रालयाने मागविला चिकुनगुनियाचा अहवाल

By admin | Updated: September 15, 2016 02:58 IST

राजधानी दिल्लीत चिकुनगुनियाने दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बुधवारी या प्रकरणी दिल्ली सरकारकडून विस्तृत अहवाल मागविला आहे

नितीन अग्रवाल , नवी दिल्लीराजधानी दिल्लीत चिकुनगुनियाने दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बुधवारी या प्रकरणी दिल्ली सरकारकडून विस्तृत अहवाल मागविला आहे, तर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दाखविली आहे. दिल्लीत चिकुनगुनियाने कहर केला असून, आतापर्यंत एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीसह देशातील अनेक भागांतील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या आजाराची माहिती घेण्यासाठी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. येथे पत्रकारांशी बोलताना नड्डा म्हणाले की, आम्ही दिल्ली सरकारकडून चिकुनगुनियाच्या मृत्यूप्रकरणी अहवाल मागितला आहे. तथापि, एक असाही मतप्रवाह आहे की, हे मृत्यू चिकुनगुनियाने होत नाहीत किंवा चिकुनगुनिया मृत्यूचे कारण बनत नाही. तरीही आम्ही दिल्ली सरकारकडून अहवाल मागविला आहे. नड्डा म्हणाले की, आपण याबाबत दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.चिकुनगुनियातील गुंतागुंतीने मृत्यू डासांपासून होणाऱ्या चिकुनगुनियाने दिल्लीत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. एका खासगी रुग्णालयात गाजियाबादच्या ८० वर्षीय वृद्धाचा या रोगाने मृत्यू झाला. गाजियाबादच्याच आणखी एका रुग्ण महेंद्र सिंह यांचा मंगळवारी अपोलो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोमवारी तीन वृद्धांचा चिकुनगुनियाने मृत्यू झाला, तर इशा या २२ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला होता. एम्समध्येही एका व्यक्तीचा चिकुनगुनियाने मृत्यू झाल्याचे वृत्त चिकुनगुनियाने सात बळी गेल्यानंतर दिल्ली सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, हे मृत्यू चिकुनगुनियाने झालेले नाहीत. पण, मीडिया तसे दाखवत आहे. वस्तुत: हा रोग घातक नाही. दिल्लीत रोज २०० लोकांचा मृत्यू होतो. पण, याबाबत कोणी विचारत नाही, असेही ते म्हणाले. नायब राज्यपालांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे व्टिटही जैन यांनी केले आहे. नेते दिल्लीच्या बाहेरनायब राज्यपाल नजीब जंग हे ३ सप्टेबर रोजी अमेरिकेतील मुलीला भेटण्यासाठी गेलेले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बंगळुरुत आहेत. मनीष सिसोदिया फिनलँडला गेलेले आहेत. तर इम्रान हुसेन हे हज यात्रेसाठी गेलेले आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हे गोव्याला गेले होते ते दिल्लीत दाखल झाले आहेत. गोपाल राय हे छत्तीसगढमध्ये आहेत.